प्रताप विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी घेतले बँकिंगचे धडे ♦️मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्र वि मं चा आर्थिक साक्षरता उपक्रम

 प्रताप विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी घेतले बँकिंगचे धडे

♦️मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्र वि मं चा आर्थिक साक्षरता उपक्रम



चोपडा दि.१२,(प्रतिनिधी ) : मुख्यमंत्री 'माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानाच्या अंतर्गत "आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास" या विषयासंर्भात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बँकिंग अनुभव मिळावेत याकरता प्रताप विद्या मंदिराच्या सकाळ विभागातील विद्यार्थ्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या चोपडा शाखेला भेट दिली. विद्यालयातील गणित शिक्षक पंकज शिंदे यांच्या संकल्पनेतून ही क्षेत्रभेट संपन्न झाली. 

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना बँकेतील विविध खात्यांचे प्रकार, पैसे भरण्याच्या फॉर्मचे नमुने पैसे काढण्याच्या फॉर्मचे नमुने, धनादेशाचा नमुना असे विविध प्रकारच्या नमुन्यांची माहिती दिली.बँकेचे व्यवस्थापक समाधान चित्रकथी यांनी विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने बचतीचे महत्व, पैशाचे नियोजन, गुंतवणूक, बँकेचे व्यवहार, कर्ज व व्याज प्रणाली इत्यादीबाबत तसेच आर्थिक व्यवहाराकरीता UPI सारख्या आधुनिक साधनांचा वापर करतांना घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

             यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी, पर्यवेक्षक एस एस पाटील, पी डी पाटील, श्रीमती एम डब्ल्यू पाटील, ए एन भट यांच्या मार्गदर्शनाखाली गणित शिक्षक पंकज प्र शिंदे तसेच बी एडचे प्रशिक्षणार्थी छात्राध्यापक  यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने