चोपडा महाविद्यालयात युवतीसभा अंतर्गत ऋतुमती अभियान व्याख्यान व रक्तगट तपासणी उपक्रमांचे यशस्वी आयोजन

  

चोपडा महाविद्यालयात युवतीसभा अंतर्गत ऋतुमती अभियान व्याख्यान व रक्तगट तपासणी उपक्रमांचे यशस्वी आयोजन



चोपडादि.१२(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा जि.जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग जळगाव  यांच्या संयुक्त विद्यमाने युवतीसभेच्या ऋतुमती अभियान अंतर्गत दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळ सत्रात व्याख्यान व दुपार सत्रात रक्त गटतपासणी या कार्यक्रमांचे आयोजन  महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप  यांच्या  मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.   या कार्यक्रमाच्या आयोजनकामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सुर्यवंशी  यांचेही सहकार्य लाभले. 

    सकाळ सत्रातील व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन एस कोल्हे हे उपस्थित होते तर उदघाटक म्हणून विद्यार्थी विकास विभाग, कबचौ उमवि जळगाव चे जिल्हा समन्वयक संजय काशिनाथ  पाटील  होते तर प्रमुख वक्ते म्हणून सौ. डॉ. प्राजक्ता भामरे ह्या उपस्थित होत्या.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे  उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी व  उपप्राचार्य  डॉ. के. एन. सोनवणे तसेच  सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आर.आर.पाटील,  युवतीसभा प्रमुख डॉ. प्रिती रावतोळे, सौ. मायाताई शिंदे, डॉ. सौ क्रांती क्षीरसागर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

   व्याख्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवतीसभा प्रमुख डॉ. सौ प्रिती रावतोळे यांनी केले तर वक्त्याचा परिचय डॉ. सौ क्रांती क्षीरसागर यांनी करून दिला.

   दुपार सत्रातील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून   जिल्हा समन्वयक,  विद्यार्थी विकास विभाग, कबचौ उमवि जळगावचे संजय काशिनाथ  पाटील तसेच व प्रमुख पाहुणे म्हणून लॅब पॅथॉलॉजीस्ट भरत सैदाने, सौ. गायत्री सैदाने व राकेश राजपूत हे उपस्थित होते. यात ८० विद्यार्थिनीचे रक्तगट  तपासण्यात आले. 

    यावेळी सौ.प्राजक्ता भामरे यांनी युवतींचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी आरोग्य ची काळजी घेणे म्हणजे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक व सामाजिक या गोष्टींचा समतोल राखण गरजेचे आहे. मासिक पाळी ही आईपण देत असते, म्हणून तिचा आदर करा व प्रेमाने त्याचा स्वीकार केला पाहिजे. सुंदरता ही फक्त बहरी नको तर मनाची असावी सुदृढ शरीराची असावी. माणूस हा समाजशील आहे त्यामूळे सामाजिक घटकांचाही आदर करणे गरजेचा आहे. तसेच आध्यात्मिक आरोग्य हे सकारात्मक दृष्टीकोण आणि एकाग्रता वाढवतो. युवतींच्या समस्यांचे ही त्यांनी निराकरण केले. 

तदनंतर उदघाटक संजय काशिनाथ  पाटील हे विद्यार्थिनींशी सुसंवाद साधतांना म्हणाले की, महिला सशक्तीकरण करण्यासाठी या कार्यकमाचे आयोजन केले आहे. सर्व सृष्टी संपली परंतु त्यात फक्त एक गर्भवती महिला जीवंत राहिली तरी हे पृथ्वीचे कालचक्र निरंतर सुरू राहील कारण या गर्भवती महिलांच्या उदरातून महापुरुष, विचारवंत जन्म घेतील. त्यामूळे नवनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या या ऋतुमती अभियानाला अनन्य साधारण महत्व आहे. 

      यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस. कोल्हे यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त करताना सांगितले की,  स्रीया ऋतुमती असताना त्यांना अपवित्र मानून दुय्यम स्थान देवून त्यांच्यावर बरीच बंधने लादली जातात. त्या रूढी, परंपरा बाजूला सारून वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगून त्यांचा सन्मान केला पाहिजे.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अश्विनी जोशी यांनी  केले तर आभार प्राजक्ता वानखेडे यांनी व्यक्त केले . 

     या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. आर. पी. जैस्वाल, सौ ए. बी पाटील, वैशाली सोनगिरे, सौ.हर्षा देवरे, प्राजक्ता वानखेडे,  पूनम जैन,  पूजा पाटील, भावना पाटील, निशा पाटील सौ.स्नेहल शिंदे,  पूजा सोनवणे, अदिती मोरे,  सौ पूजा पून्नासे, कोमल पाटील, मयूरी पाटील, दर्शन पाटील, जितेंद्र कोळी, नीलेश भाट,विशाल बोरसे  यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने