आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या विकास कामांचा प्रभाव कानाकोपऱ्यात..पक्ष प्रवेशाची दमदार एंट्री सुरूच..

 आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या  विकास कामांचा प्रभाव कानाकोपऱ्यात..पक्ष प्रवेशाची दमदार एंट्री सुरूच..

♦️दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिधा कीट वाटप शुभारंभ 


चोपडा दि.१२(प्रतिनिधी): आमदार सौ. लताताई सोनवणे व कार्यसम्राट माजी आमदार प्रा. श्री. चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वावरील  विश्वास आणि त्यांच्या विकास कामांच्या प्रभावाची छाया मतदार संघात काना कोपऱ्या पर्यंत जनतेवर पडत असून मायेचा ओलावा सर्वांनाच मिळत असल्याने शिवसेनारुपी वटवृक्षाच्या शितल छायेत गर्दी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा घोळका झपाट्याने गोळा होऊ लागल्याचे चित्र  दिसतं आहे.लोकसभेचे बिगुल   वाजण्या आधीच भर उन्हाळ्यात शिवबंधन बांधणाऱ्या तरुण वर्गामध्ये कमालीचा बदल  पाहायला मिळत आहे.   विचखेडा धुपे ,घाडवेल, चहार्डी,लासुर पाठोपाठ आता वेळोदे,गणपुर चोपडा येथील अष्टपैलू कार्यकर्त्यांनी काल,दि.१२फेब्रुवारी रोजी मोठ्या  संख्येने  शिवबंध हाती बांधल्याची घटना घडली.दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिधा कीट वाटप शुभारंभ करण्यात आला.

वेळोदे येथील रहिवासी हॉटेल सपना गार्डन व हॉटेल दिपक चे संचालक श्री बिपिन हिम्मतराव नेरपगारे उर्फ बाळू नाना. तसेच पीक संरक्षण सोसायटीचे माजी चेअरमन, कोळी समाजाचे अभ्यासू नेतृत्व व समाजसेवक श्री संजय रामकृष्ण सैंदाणे उर्फ संजूबाबा व वेळोदे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच यांचे पती श्री वसंत रघुनाथ करंदीकर, आणि तेली समाजाचे युवा नेतृत्व श्री अशोक अर्जुन चौधरी व गणपूर श्री चेतन करंदीकर यांनी आज शासकीय विश्रामगृह चोपडा येथे शिवसेना शिंदे गट या पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. 

याप्रसंगी माजी उपसरपंच विभाग प्रमुख श्री बापू मोरे,श्री राजेंद्र पाटील, संचालक शिवराज पाटील,संचालक विजय पाटील, विभाग संघटक श्री अशोक पवार, गलंगी ग्रा.प.सदस्य व संचालक श्री किरण देवराज,कुणाल पाटील,उपसरपंच प्रताप आण्णा,सागर ओतारी,वाल्मिक कोळी, भाऊसाहेब बिऱ्हाडे, घोडगाव ग्रा पं स श्री सुनील कोळी, श्री विकास रायसिंग तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिधा कीट वाटप शुभारंभ 

चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप चोपड्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व उद्योजक घनश्याम भाई अग्रवाल यांचा हस्ते पूजन करून आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला ह्यावेळी तालुक्यातील 50 हजार लाभार्थ्यांना आनंदाचा शिधाचा लाभ मिळणार असल्याची माहिती चोपड्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी माहिती दिली.यावेळी चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पुरवठा अधिकारी देवेंद्र नेतकर, गोडाऊन किपर योगेश नन्नवरे, सुनील बरडीया, विपीन जैन, राजेंद्र पाटील, शिवराज पाटील, पप्पू पाटील, प्रवीण साळुंखे, दीपक चौधरी, नंदू गवळी, चांदुभाऊ बाविस्कर, सह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने