पत्रकार निखिल वागळे व सहकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या भाकपतर्फे निषेध ♦️सद्सद विवेक बुद्धी असणाऱ्या प्रत्येकाने पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे:कॉ.अमृत महाजन

 पत्रकार निखिल वागळे  व सहकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या  भाकपतर्फे निषेध 

♦️सद्सद विवेक बुद्धी असणाऱ्या प्रत्येकाने पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे:कॉ.अमृत महाजन 

चोपडा,दि.१२(प्रतिनिधी)..परवा रोजी पुण्यात झालेल्या निर्भय बनो कार्यक्रमात जाताना महाराष्ट्रातील जेष्ठ पत्रकार निखिल वागळे ,विश्वंभर चौधरी एडवोकेट असीम सरोदे यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला तो निंदणीय आहे  त्या हल्ल्याचा  भारतीय कम्युनिस्ट पक्ष निषेध करतो व अशावेळी राज्यात सद्सद विवेक बुद्धी असणाऱ्या प्रत्येकाने अशा जनतेच्या न्यायासाठी झिजणाऱ्या पत्रकारांच्या पाठीमागे उभे राहणे आवश्यक आहे असे प्रतिपादन पक्षाचे कॉम्रेड अमृत महाजन एका पत्रकाद्वारे केले आहे.

यावेळी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पुढे त्यांनी म्हटले आहे की  आपण  डॉक्टर नरेंद्र दाभोलकर कॉ गोविंद पानसरे , डॉक्टर कलबुर्गी पत्रकार कलबुर्गी अशा नेत्यांना गमावलेले आहे गाडी खाली कुत्रा मेला तर थोडेफार दुःख होणारच असे वाक्य एका भाजप नेत्यांनी मागे केले होते त्याही पुढे जाऊन महाराष्ट्राचे गृहमंत्री  हे अशी भाषा वापरत आहेत हे निंदनीय आहे.  महाराष्ट्र राज्यात रोज सुरू असलेला हिंसक घटना व जातीय दंगली पेटवण्यासाठी सोशल मीडियातून केले जाणारे प्रचार कट कारस्थाने अफवा पसरवणे महापुरुषांना धर्माचे लेवल लावून राजकारणासाठी धर्माचा वापर करणे  असे समाजाच्या विविध घटकांमध्ये  पसरवण्यासाठी केले जाणारे खेळ आपण पाहत आहोत .  तसेच  जनविरोधी धोरणामुळे   शेतकरी शेतमजूर महिला कामगार दलित वर्ग  मेटाकुटीस आलेला आहे.राजकारण्यांना जनतेचे प्रश्नांशी काही घेणे देणे राहिलेले नाही म्हणून अशा परिस्थितीत जनतेच्या पाठीमागे उभे राहणारे लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार यांनी सत्य बोलू नये म्हणून त्यांच्यावर असे हल्ले केले जात आहेत हे थांबवले पाहिजे आणि पत्रकारांच्या पाठीमागे उभे राहणे आवश्यक आहे . असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ अमृत महाजन यांनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने