युवकांना घडवण्याची कार्यशाळा म्हणजे शिबीर होय - पिटीसी चेअरमन संजय.ओं.वाघ

 युवकांना घडवण्याची कार्यशाळा म्हणजे शिबीर होय - पिटीसी चेअरमन संजय.ओं.वाघ

भडगाव,दि.१२(प्रतिनिधी )-राष्ट्रीय सेवा योजना शिबीर म्हणजे सामाजिक कार्यकर्ता घडविण्याचे शिबीर असतें ग्रामीण जीवनातील समस्या, शेतीचे कामे,ग्राम स्वच्छता, विद्यार्थ्यांचे कर्तव्य यांची कार्यशाळा होय असे प्रतिपादन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप समारंभच्या वेळी केले .


 राष्ट्रीय सेवा योजनाचे वडजी तालुका भडगाव येथे सौ रजनीताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भडगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष विभागाच्या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप समारंभ दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाला. यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय नानासो संजय ओंकार वाघ यांच्या शुभ हस्ते समारोप समारंभ संपन्न झाला. विनय जकातदार यानी,आजच्या युवकानी अभ्यास सोबत आई वडील, गुरुजनाचे मार्गदर्शन घेतले पाहिजे व देशाप्रती निष्ठा, पर्यावरण सौरक्षण करावे असे प्रतिपादन केले. समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. नानासाहेब व्ही टी जोशी,संचालक बाबासो. विनय जकातदार,नानासो विजय देशपांडे ताईसो मनीषा अरुण पाटील समारंभाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन एन गायकवाड यांनी केले. कार्य क्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी ए मस्की यांनी केले. शिबिराचा सात दिवसाचा आढावा कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बी एच पाटील यांनी सादर केला. गोपाल पाटील आणि कु जागृती जाधव या स्वयंसेवकांनी शिबीराबद्दल मनोगत व्यक्त केले.समारोप समारंभाला मोठाभाऊ अभिमन सीताराम पाटील( माजी सभापती पंचायत समिती भडगाव), वडजी गावच्या सरपंच ताईसो मनीषा विजय गायकवाड, उपसरपंच स्वदेश पितांबर पाटील, सदस्य भाऊसाहेब परदेशीं, समाधान पाटील, राजू सोनवणे, कैलास पाटील, राजेंद्र पाटील, बाबाजी पाटील,दिनेश लखीचंद परदेसी,श्री संजयभाऊ परदेशी,ग्रामसेवक ए. जी. पाटील, क्लर्क मधुकर पाटील उपस्थित होते. शिबिराच्या शेवटच्या दिवशी भडगाव येथील माननीय डॉ. ईश्वरसिंग परदेशी यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले, अध्यक्षपद प्रा. जी एस अहिरराव यांनी सांभाळले. महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीमती अर्चना नामदेव टेमकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. शिवाजी पाटील यांनी केले. उपप्राचार्यप्राएस आरपाटील,. डॉ ए एन भंगाळे, प्रा डॉ.अतुल देशमुख, प्रा. डॉ. चित्रा पाटील, प्रा. श्रीमती रचना गजभिये, प्रा. डॉ. सौ इंदिरा लोखंडे-बारी, डॉ. सचिन हडोळतीकर, डॉ. गजानन चौधरी, संजय झाल्टे, प्रा. एम डी बिर्ला, प्रा डॉ एन व्ही चिमणकर, प्रा जे जे देवरे, प्रा अधिकराव पाटील, प्रा डॉ. बी एस भालेराव, डॉक्टर मानसिंग राजपूत, हे उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचारी मधून श्री.सुनील पाटील, श्री.दिलीप तडवी, श्री.दिलीप चौधरी, श्री अजय देशमुख, श्री.प्रविण तडवी श्री तुळशीराम महाजन, मनोहर महाजन हे उपस्थित होते.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने