घाडवेल येथे १४ रोजी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा.. हस्ते महामंडलेश्वर बालयोगिजी महाराज

 घाडवेल येथे १४ रोजी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा.. हस्ते महामंडलेश्वर बालयोगिजी महाराज 

चोपडा दि.१२( वार्ताहर ) - तालुक्यातील घाडवेल येथे उभारण्यात आलेल्या मंदिरात दि.१४ रोजी विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा व कलशारोहण महा मंडलेश्वर बालयोगिजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न  होणार आहे.याप्रसंगी प्रमुख अतीथी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील,आ.सौ.लता सोनवणे माजी आ.चंद्रकांत सोनवणे,शरद कासट यांची उपस्थिती लाभणार आहे

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक १२ रोजी सकाळी ८ ते १२  देवांची व परमपूज्य बालयोगजी महाराज यांची शोभायात्रा असेल,व दुपारी 12 वाजता जलाधिवास प्रायचित संकल्प,गणेश पूजन,पुण्याहवाचन मातृकापूजन,नंदी श्राद्ध,ब्राह्मण पूजन,मंडल देवता स्थापन,वास्तु मंडल,योगिनी मंडल,सर्वता भद्र मंडल,नवग्रह मंडल,रुद्र देवता स्थापना आणि सायंकाळी आरती होईल.रात्री ८ ते ११ अंध बांधवांचा संगीतमय सुर सितारा भजन संध्या हा कार्यक्रम होईल दि.१३ रोजी सकाळी विधीवत पूजा व रात्री 8 ते 12 गॅलेक्सी म्युझिकल भक्ती संगीत यांची भजन संध्या होईल दि.१४ रोजी सकाळी नऊ वाजता पूजन,अभिषेक,हवन तर ११ वाजून १५  मिनिटांनी विठ्ठल रुक्मिणी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व 11.30 वाजता परम पुज्य बालयोगजी महाराज यांच्या  अमृत वाणीतुन सत्संग व दुपारी बारा वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजक सार्वजनिक विठ्ठल रुक्मिणी मंदिर,महादेव मंदिर,हनुमान मंदिर संस्थान व घाडवेल ता.चोपडा येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने