शहादा तालुक्यातील ठेवीदारांचे ठेवी परतीसाठी भारतीय जनसंसदेच्या नंदूरबार जिल्ह्याच्यावतीनेप्रशासनाकडे निवेदन सादर

 

शहादा तालुक्यातील ठेवीदारांचे ठेवी परतीसाठी भारतीय जनसंसदेच्या नंदूरबार जिल्ह्याच्यावतीनेप्रशासनाकडे निवेदन सादर

============

शहादा,(वार्ताहर )दि.20/-शहादा तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचे ठेवीदार ठेवी परत मिळणेसाठी गेल्या वर्षभरापासून पतसंस्थांचे संचालक व अधिकारी यांचेकडे मागणी करीत आहेत.मात्र संबंधित संस्थाचालक व अधिकारी आणि सहकार खात्याने टाळाटाळ करीत आहेत. सदर पतसंस्था ह्या संस्थाचालक व अधिकारी यांच्या गैरव्यवहार अवैधपणे केलेला खर्च वेळीच आॅडीट होत नसते.यामुळे बंद पडल्या असून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शहादा यांच नियंत्रण शुन्य असल्याने संस्था बंद होत असल्याची चर्चा आहे. शहादा तालुक्यातील (१)कै.आर.एफ.पाटील सह.पत.शहादा, (२)कै.का.स.पाटील सह पत.शहादा,(३)मातोश्री सह. पत. शहादा, (४)महात्मा गांधी सह.पत.शहादा,(५)जययोगेश्वर सह. पत.ब्राम्हणपूरी.यां व अशा अनेक पतसंस्थां बंदच्या मार्गावर असल्याचे समजते. त्यामुळेच भारतीय जनसंसद संघटना,व ग्राहक पंचायतीचे सर्व पदाधिकारी यांनी सदर ठेवीदारांना सहकार्य करावे म्हणून एकत्रीत लढा देण्याचा निर्धार केला असून जोपर्यंत ठेवी परत मिळणार नाही तोपर्यंत हा लढा चालुच राहील असा निर्णय घेण्यात आला.यामुळेच आज संबंधीत संस्था चालक व संबंधित कर्मचाऱ्यां विरूध्द कायदेशीररीत्या कार्यवाही व्हावी आणि ठेवीदारांना त्यांच्या अडकलेल्या ठेवी लवकरात लवकर पूर्ण परत मिळव्यात यांसाठी  दि.२०/२/२०२४ रोजी भारतीय जनसंसद संघटना व ठेवीदार यांनी म.सहायक निबंधक सहकारी संस्था शहादा, प्रांताधिकारी शहादा, विभागीय पोलीस अधिकारी शहादा, पोलीस निरीक्षक शहादा, व तहसीलदार शहादा यांना लेखी निवेदन दिले.

यां निवेदनावर जनसंसद संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ गिरधर पाटील, सचिव सुरेश विठ्ठल तालुकाध्यक्ष प्रसन्न सुभाष बंब,संघटक गिरधर विक्रम मोरे, शहराध्यक्ष प्रदीप काशिनाथ कामे,ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष उदय निकुम,के.डी.गिरासे सरव्यवस्थापक नंदुरबार जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सह फेडरेशन मर्या शहादा जि नंदुरबार यांचेसह  ठेवीदारांच्या सह्या केल्या आहेत.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने