अडावद आरोग्य केंद्रामार्फत ३ मार्च २०२४ पोलिओ मोहिमेची जनजागृती

 अडावद आरोग्य केंद्रामार्फत ३ मार्च २०२४ पोलिओ मोहिमेची जनजागृती



चोपडा दि.२५(प्रतिनिधी)जरी आपला देश २०१४ मध्ये पोलिओ मुक्त झाला असला तरी शेजारील काही देशातून पोलिओ हद्दपार झालेला नाही,म्हणूनच सुरक्षेसाठी आपल्या देशातील वय वर्षे ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्याचा निर्धार केला आहे.जिल्ह्यचे आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी जिल्ह्यातील सर्व ७७ आरोग्य केंद्रांना भेटी देऊन, कुपोषण, बाल मृत्युदर, माता मृत्यू दर, त्याच प्रमाणे पोलिओ आजाराविषयी ते सर्व वैद्यकीय अधिकारी यांना सूचना व मार्गदर्शन करीत आहेत.

त्याच अनुषंगाने... जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नुकतीच चोपडा कार्यालयास भेट देऊन, तालुका आरोग्य अधिकारी-डॉ प्रदीप लासुरकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली, कुपोषित बालकांचे शिबीर, पोलिओ मोहीम, बिनटाका स्त्री शस्त्रक्रिया शिबिराचे नियोजनाविषयी माहिती घेतली.

पल्स पोलिओ २०२४ या अभियानांतर्गत महाराष्ट्रासह, जास्तीत जास्त प्रमाणात बालकांना पोलिओचे डोस पाजले गेले जावेत या उद्देशाने, चोपडा तालुक्यातील आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी व अडावद आरोग्य केंद्रातील सम्पूर्ण परिसरातील.. बस स्टँड, बाजारपेठ, गर्दीच्या व इतर मोक्याच्या ठिकाणी,आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत.. रविवार  ३ मार्च २०२४ या पल्स पोलिओ मोहिमेच्या तारखा व स्लोगन भिंतीवर रंगवल्या जात असून,स्वतः जनजागृती करण्यात व भिंती रंगवतांना आरोग्य सेवक-विजय देशमुख, संतोष भांडवलकर, कैलास बडगुजर, आर एस पाटील आदी अडावद येथील कर्मचारी हे परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने