चोपडा न.पा.चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी हेमंत निकम यांना धुळे महानगरपालिका उपायुक्त पदी बढती..

 

चोपडा न.पा.चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी हेमंत निकम यांची धुळे महानगरपालिका उपायुक्त पदी बढती.. 

चोपडा दि.५(प्रतिनिधी)नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत आबासाहेब निकम यांची  चोपडा येथून बदली झाली असून  धुळे महानगरपालिका उपायुक्त पदी बढती मिळाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.तर चोपडा येथे नव्याने मुख्याधिकारी म्हणून कोणाची वर्णी लागते यासाठी चार पाच दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.

हेमंत आबासाहेब निकम ह्यांनी चोपडा नगरपालिकेचे सुत्र २६ एप्रिल रोजी हाती घेताच त्यांनी आपल्या शांत व मित स्वभाव आणि कुशाग्र बुद्धीचे जोरावर शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी जीव ओतून काम केले.स्वच्छ शहर व सुंदर शहराला प्राधान्य देत नपाला अव्वल स्थानावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहिलेत.तसेच विशेष मोहीम हाताळून न.पा.कर वसुली जोमाने राबवून कोट्यवधींचे थकीत कर्ज फेडण्यात मोलाची भूमिका निभावली. त्यांच्या उपरोक्त बढतीने चोपड्यात आनंद पसरला आहे मात्र चांगल्या अधिकाऱ्यांच्या सेवेला चोपडेकर मुकणार असल्याने अनेकांनी खेदही व्यक्त केला आहे.निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही बदली झाल्याची  खात्रीलायक माहिती  विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली.

 जळगावच्या भूमीचे नाव आख्ख्या महाराष्ट्रात गाजविणारे कुशल, कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांच्या यादीतील ते एक आहेत . खान्देश चे सुपूत्र चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथील रहिवासी  असून टॉप टेनच्या  यादीतील मित स्वभावी,मेहनती आणि जनतेला आपलेसे करणारी ह्रदयस्पर्शी व्यक्तींमध्ये त्यांच्या नावाचा समावेश आहेत.ते धामणगावंचे रहिवासी,काळ्या मातीत अहोरात्र राबणाऱ्या आबासाहेब पंढरीनाथ निकम यांचे चिरंजीव आहेत.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी सामना करत मोठ्या जिद्दीने कोल्हापूर येथे बी.एस.सी.अग्री पदवी घेतल्यानंतर शर्थीचे प्रयत्न करून मुख्याधिकारी पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत.कठोर परिश्रमिक सर्व सामान्य जनतेच्या  समस्या सोडविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चोपडा बदलीने नगरवासियांमध्ये खेद प्रकट केला जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने