राष्ट्रवादी किसान सेलच्या तालुकाध्यक्षपदी निवड इंद्रजित पाटील

 राष्ट्रवादी किसान सेलच्या तालुकाध्यक्षपदी निवड इंद्रजित पाटील




चोपडा,दि.३(प्रतिनिधी) तालुक्यातील खाचणे येथील रहिवासी व राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते इंद्रजित गोकुळ पाटील यांची राष्ट्रवादी किसान सेलच्या तालुकाध्यक्ष पदीनिवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सोपान बाबुराव पाटील यांनी एका पत्रकान्वये ही नियुक्ती केली आहे.
इंद्रजित पाटील यांचे उत्कृष्ट कार्य पाहून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी किसान सेलच्या माध्यमातून  शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळापर्यत पोहचविण्याची व तसेच शेतक-यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे माजी विधानसभा सभापती अरुण भाई गुजराती, माजी चोसाका चेअरमन घनश्याम अण्णा पाटील, माजी आमदार कैलास पाटील,  पीपल बँक चेअरमन  चंद्रहास भाई गुजराती, दिलीपराव सोनवणे, गोरख तात्या पाटील, सौ इंदिरा ताई पाटील,  शशी पाटील, चंद्रकांत पाटील,शशि देवरे भाऊसाहेब पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने