चोपडा येथे बौद्ध महासभेकडून त्यागमूर्ति रमाई जयंती साजरी

 चोपडा येथे बौद्ध महासभेकडून त्यागमूर्ति रमाई जयंती साजरी


  चोपडा,दि.९(प्रतिनिधी) येथे दि ७फेब्रुवारी २०२४ रोजी दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल चोपडा तालुक्याच्या वतीने त्यागमूर्ती दीनदलितांची माता रमाबाई भिमराव आंबेडकर तथा रमाई जयंती साजरी करण्यात आली 

यावेळी बापूराव गिरधर वाणे तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या अध्यक्षतेखाली  कार्यक्रम घेण्यांत आला. रमाई जयंती  निमित्त विद्यार्थीनीनी व काही मान्यवरांनी रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार  मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. रमाई च्या जीवनावर उत्कृष्ट भाषण व गीतगायन तसेच उत्कृष्ट नृत्य सादर केल्या बद्ल करीना विजय शंभरकर, लुम्बिनी प्रविण करनकाळ,श्रृती राहूल ढिवरे,भाविका विलास भालेराव इतर १० विद्यार्थीना सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले .

      यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.व प्रास्तविक सुकदेव बाविस्कर यांनी केले .

      कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आयु.अशोक बाविस्कर जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,बापूराव वाणे सर भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष,

 रमेश शिंदे मा. नगरसेवक, संतोष अहिरे सामाजिक कार्यकर्ते,हितेंद्र मोरे माजी मुख्याध्यापक तथा जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा, कैलास सोनवणे मा.नगसेवक, समाधान सपकाळे,सामाजिक कार्यकर्ते, जानकीराम सपकाळे,सुदाम ईशी,मिलिंद सोनवणे पत्रकार,दिवाणजी साळुंखे,रवींद्र देवचंद वाघ,छोटू वारडे,प्रविण करनकाळ व महिला,समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समाज बांधव यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने