कृषी विभागाने केळी पिक विमा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी..भारतीय किसान संघटनेची मागणी

 

कृषी विभागाने केळी पिक विमा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी..भारतीय किसान संघटनेची मागणी 


रावेर दि.९(प्रतिनिधी):शासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे कृषी विभागाने केळी पिक विमा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी भारतीय किसान संघटनेचे प्रशांत बोरकर यांनी  केली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून केळी पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित असून शेतकरी केळी पिक विमा मिळत नसल्याने अत्यंत परेशान झाला असून त्या संदर्भामध्ये भारतीय किसान संघटनचे प्रदेश अध्यक्ष यांनी गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करीत असून शेतकरी व त्यांचे कार्यकर्ते निरंतर लढा देत आहेतआज रोजी भारतीय किसान संघटन चे प्रदेश अध्यक्ष श्री प्रशांत बोरकर ,जिल्हाध्यक्ष संजय चौधरी तसेच वाघोदा चे शेतकरी बांधव तसेच दीपक भालेराव दामोदरे अजगर अली आधी अनेक कार्यकर्ते व शेतकरी वर्ग शेतकरी पिक विमा साठी तालुका कृषी अधिकारी श्री वाळके साहेब यांच्याशी चर्चा केली. तसेच पिक विमा दीरंगाई बाबत त्यांना प्रश्न विचारले तसेच चर्चा केली तसेच भारतीय किसान संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत बोरकर यांनी यांनी मुख्यमंत्री तसेच कृषी विभागाकडे कृषी मंत्र्यांकडे केलेल्या मागण्यानुसार आदेशानुसार विमा कंपन्यांना सूचना कराव्यात काल रोजी जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पिक विमा मिळण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे सुचवले त्यासंदर्भात काही त्रुटी शेतकऱ्यांनी पूर्तता करून देण्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी श्री प्रशांत बोरकर यांनी नुकसान भरपाई होत असेच अन्य शेतकरी योजना सुद्धा लाभ शेतकऱ्यांना मिळावा अशी अपेक्षा केली गेल्या अनेक दिवसापासून श्री प्रशांत बोरकर पिक विमा चा निरंतर पाठपुरा करीत असून त्याबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने