जळगाव जिल्ह्यातून मुंबईला आशा गटप्रवर्तकांची 26 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आंदोलन

 जळगाव जिल्ह्यातून मुंबईला आशा गटप्रवर्तकांची  26 फेब्रुवारी रोजी  अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आंदोलन


चोपडा,दि२४(प्रतिनिधी )   आशा व गटप्रवर्तक  यांच्या  प्रलंबित  मागण्यांसाठी साठी  मुंबई येथे आझाद मैदानावरील आंदोलनाचा तेरावा दिवस  होता या तेराव्या दिवसाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवला. जळगाव जिल्ह्यातून सुद्धा या आंदोलनात दहा दिवसात तीनदा आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्यात

याबाबत सविस्तर असे की सरकारने जाहीर केलेली मानधनवाढ भाऊबीज व इतर मागण्यांच्या जीआर काढावा या मागण्यांसाठी गेल्या चाळीस दिवसापासून महाराष्ट्रभर चाललेल्या 70 हजार आशा व साडेतीन हजार गटप्रवर्तक यांच्या बेमुदत  चाललेल्या महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री  उपमुख्यमंत्री वित्त मंत्री  दाद देत नसल्यामुळे संतप्त आशा  व गटप्रवर्तक यांनी आपला रोष व्यक्त केला   नऊ 9 फेब्रुवारी रोजी  मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला  जळगाव जिल्ह्यातील गटपर्वतक भेटल्या  त्यावेळी  पंधरा दिवसाचा वायदा या सरकारने केला होता  परंतु  तो देखील पाळलेला नाही  त्यामुळे महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तक यांच्यावर पुन्हा 12 जानेवारीपासून संप लादला  गेला   भाऊबीजही दिलेली नाही एपीएल बीपीएल लाभार्थींना लाभ देण्यात भेद काढून टाकण्याचा परिपत्रके काढलेले नाही  दुसरीकडे संपामुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत म्हणून येत्या 26 फेब्रुवारी रोजी  महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना वर पुन्हा जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे.   संपला महाराष्ट्र  भर  व जळगाव जिल्हा तही चांगला प्रतिसाद मिळत आहे गेल्या दहा दिवसात तर जळगाव धरणगाव चोपडा भुसावल यावल तालुक्यातून शेकडो कर्मचाऱ्यांनी तीन वेळा मुंबईला जाऊन आंदोलनात भागीदारी केली या  आंदोलनात आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन सचिव सुलोचना साबळे यांचे नेतृत्वात मीनाक्षी सोनवणे विद्या देवी बाविस्कर मनीषा पाटील भारती सपकाळे सरला कोळी संजना गोडघाटे जाहिरा फारुकी मालू नरवाडे खाचने प्रतिभा पाटील शुभांगी धांडे आशा पाटील वैशाली तायडे रत्ना  दुप्पड  रेखा कोलते हर्षाली चौधरी हाजरा तडवी तसेच गटप्रवर्तक संघटनेच्या संघटक सुनिता ठाकरे संगीता माळी नीता माळी अपेक्षा माळी छाया मोरे ललिता सपकाळे  मनीषा बैरागी संगीता चौधरी आधी नेहमी भाग घेतला उर्वरित कर्मचाऱ्यांनी येत्या 25 फेब्रुवारी रोजी जळगाव भुसावल चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर सायंकाळपर्यंत जमावे असे आवाहन आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे 

 सरकारच्या तेराव्याला  जाऊन आलो म्हणा  आता सव्वीस तारखेला बजेट अधिवेशन आहे त्यात आशांसाठी   26 फेब्रुवारी मुंबईला जायचं आहे 25 फेब्रुवारी रोजी निघायचे आहे भगिनींनो तयारी करा असे आवाहन करण्यात आले आहे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने