महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न..!

 महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे  राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न..!


अकोले- अघई (शहापूर) जि. ठाणे दि.१६ : येथील आत्मामालिक अध्यात्मिक शक्तीपीठ येथे महाराष्ट्र राज्य आश्रम शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन दि.13 व 14 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते सदर  अधिवेशन नामदार श्री विजय कुमार गावित ( आदिवासी विकास मंत्री )यांच्या अध्यक्षतेखाली दि 13 जानेवारी 24 रोजी सकाळी  हस्ते संपन्न झाले सदर अधिवेशनास आमदार निरंजन डावखरे,आमदार दौलत दरोडा,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच आदिवासी विकास विभागाचे सचिव मा विजय वाघमारे, आदिवासी विकास विभाग मंत्रालय व प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे शहापूर, हे आदिवासी विकास विभागातील अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते 

दोन दिवशीय ऐतिहासिक अधिवेशनात आश्रमशाळेतील शिक्षण व्यवस्थापनात मुख्याध्यापकाची भूमिका, आश्रमशाळा गुणवत्तावाढ व सर्वांगीण विकास कार्यक्रम, मुख्याध्यापक शालेय प्रशासन व व्यवस्थापन या विषयावरील परिसंवादात आदर्श ग्राम समिती सदस्य महा.राज्य भास्करराव पेरे, डाॅ.रत्नाकर आहेर,चंद्रकांत निंबाळकर, सिताराम कापसे (उपायुक्त),सिटु संघटणेचे श्री भामरे सर यांनी उपस्थितांना उद्बोबोधित केले. 

अधिवेशनातआश्रमशाळाविद्यार्थ्यांनच्या सर्वांगीण  विकास व विविध विषयावर दोन दिवस मंथन झाले असून राज्यातील आश्रमशाळा मुख्याध्यापक पदासाठी येण्याऱ्या विविध अडचणी समस्या व त्यावर योग्य तो पर्याय यावर सांगोपांग विचार मंथन राज्य अध्यक्ष मा रिंगणे सर यांनी सविस्तर मांडल्या यावर

आदिवासी विकास मंत्री मा नामदार विजय कुमार गावित साहेब यांनी जवळपास 3तास मुख्याद्यापकाशी  चर्चा करून सवड साधून संघटनेच्या महत्त्वाचे दोन प्रमुख मागण्या मान्य करून मंत्रालयात येत्या बुधवारी  17/1/24 रोजी संघटनेचे पदाधिकारी यांना बैठकी साठी आमंत्रित करण्यात आले आहे हे एक नवीन वर्षासाठी मकर संक्रांतीच्या गोडवा राज्यातील सर्व मुख्यद्यापकाना  दिल्यामुळे सर्वानी खुप समाधान व्यक्त केले या ऐतिहासिक तिसऱ्या अधिवेशनासाठी राज्य अध्यक्ष मा रिंगणे सरांच्या मार्गदर्शनाखाली  ठाणे विभागाचे विभागीय अध्यक्ष श्री गावडे सर व त्यांची पूर्ण टीम तसेच राज्य व विभागाचे अध्यक्ष सर्व कार्यकारिणी चे सदस्यांनी तसेच आलेल्या सर्व मुख्यद्यापकानी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेत अशी माहिती राज्य अध्यक्ष वामणराव रिंगणे तसेच राज्य प्रसिद्धी प्रमुख श्री सुनिल चौधरी यांनी दिली. राज्य सरचिटणीस मा कलसाईत सर यांनी राज्य कार्यकारिणी मध्ये रिक्त झालेल्या पदांवर सर्वानुमते नव्याने नेमणूक करण्यात आली राज्य सचिव मुख्याद्यापक श्री अनिल कांबळे सर यांनी आभार व्यक्त केले व राष्ट्रगीत म्हणून ऐतिहासिक अधिवेशनाची सांगता करण्यात आली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने