महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने घेतलेल्या जाहिरात निर्मिती स्पर्धेत कुणाल कोळी यांना प्रथम पारितोषिक

 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने घेतलेल्या जाहिरात निर्मिती स्पर्धेत कुणाल कोळी यांना प्रथम पारितोषिक

मुंबई,दि.२५ - महाराष्ट्र राज्य  निवडणूक आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभिव्यक्ती मताची या जाहिरात निर्मिती स्पर्धेत चि. कुणाल सुरेश कोळी यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. 

कुणाल हे जे के अकॅडेमी ऑफ आर्ट अँड डिझाईन, मुंबई या महाविद्यालयात कला क्षेत्राचे शिक्षण घेत आहेत. कलेचे शिक्षण घेत असताना राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांच्या सर्व संघाने हॅलो या जाहिरातीची निर्मिती केली व प्रथम पारितोषिक पटकाविला. त्यांना पारितोषिक राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ते बेलापूर येथे स्थित श्री.सुरेश रघुनाथ कोळी यांचे चिरंजीव तर श्री.समाधान सोनवणे सर, चोपडा यांचे पुतणे आहेत. या पारितोषिक प्राप्तीबद्दल संम्पूर्ण कुटुंबियांनी चि. कुणाल चे कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने