न्याहळोद गावात प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

 

न्याहळोद गावात प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा


शिंदखेडा दि.२५(प्रतिनिधी)न्याहळोद गावात आदिवासी टोकरे कोळी जमातीचे आद्यकवी महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या मंदिरात,महर्षी वाल्मिकी महाराज, प्रभू श्रीराम,सितामाता,लक्ष्मण, व वीर हनुमानजी यांच्या मूर्तींचे प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने सपन्न झाला. त्या सोबतच महाप्रसादाचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण ग्रामस्थांनी या सोहळ्याला हजेरी लावली व महाप्रसादाचा लाभ घेतला.
दि. 20/2/2024 रोजी संपूर्ण गावात सर्व मूर्तींची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. त्यासोबतच पुढे हिंदू बांधवांनी कळस यात्रा ही आयोजित केली होती. संपूर्ण न्याहळोद गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.प्रत्येक घरातून गहू व तांदूळ देण्यात आले होते. जवळपास 12/15 क्विंटल धान्य गोळा झाले असेल. त्याच धान्यातून बरकत म्हणून काही धान्य देण्यात येत होते. विशेष म्हणजे महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 21/1/2024 रोजी महापूजा आयोजित केली होती.
आयोध्यात होणाऱ्या  प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा हा दि.22/1/2024 ठीक 12:29 मि. होणार होता.त्याच तिथीला म्हणजेच 12:29  इकडे न्याहळोद गावात पण प्राण प्रतिष्ठा सोहळा हा पार पडला.हा योग पाहून बाहेर गावावरून आलेले लग्न कार्यातील पाहूणे मंडळीनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. संपूर्ण न्याहळोद गाव हे रांगोळी व दिव्यांच्या प्रकाशाने सुशोभित झाले होते. संपूर्ण भारतात दिवाळी साजरा झाली. त्याचप्रमाणे न्याहळोद गावात सुद्धा दिवाळी सारखा क्षण निर्माण झाला होता.लोकांनी फटाके फोडून दिवाळी सोहळा साजरा केला.श्रीराम भक्तांनी संपूर्ण गावात अक्षता वाटप हा कार्यक्रम पार पाडला.
न्याहळोद ग्रामपंचायतीने सुद्धा चार दिवस मांसाहार करू नये ही नोटीस काढून संपूर्ण गावातील ग्रामस्थांचे मने जिंकली.

दि.22/1/2024 रोजी महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या मंदिरात रात्री विविध गावातील,शहादा, शिरपूर, सबस्टेशन, न्याहळोद येथील भजनी मंडळी आली होती. त्यांनी आपल्या  वाणी व कौशल्याने श्रोत्यांची मने जिंकली.संपूर्ण कार्यक्रम हा मोठ्या उत्साहाने साजरा झाला. या कार्यक्रमला समस्त गांवकरी बांधवांनी सहकार्य केले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने