आदिवासी अनुसूचित टोकरे, महादेव, मल्हार कोळी जमातीचा ४ जानेवारी पासून शासनाला आमरण उपोषणाचा इशारा

 आदिवासी अनुसूचित टोकरे, महादेव, मल्हार कोळी जमातीचा ४ जानेवारी पासून शासनाला आमरण उपोषणाचा इशारा


जळगाव दि.२(प्रतिनिधी ):– आदिवासी अनुसूचित टोकरे, महादेव, मल्हार कोळी जमातीच्या बांधवानी ऑक्टोबर महिन्यात तब्बल २६ दिवस उपोषण केल्यानंतर २० ऑक्टोबर २०२३ रोजी मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी जमातीच्या शिष्ट मंडळाची बैठक पार पडली. त्या बैठकीत आदिवासी अनुसूचित टोकरे, महादेव, मल्हार कोळी जमातींना सुलभरीत्या जातीचे प्रमाणपत्र द्यावेत तसेच सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली आदिवासी कोळी जमातींचे प्रलंबित धोरणात्मक समस्या सुटण्याकरिता समिती स्थापन करण्याचे आदेश मा. मुख्यमंत्री यांनी निर्गमित केले होते. पण दोन महिन्याच्या वर कालावधी उलटून सुद्धा सदर आदेशानुसार कार्यवाही व आदिवासी अनुसूचित कोळी जमातींना न्याय देण्याकरिता आदेशित समिती स्थापन करण्याबाबत ठोस असे पाउल शासनाने न उचलल्यामुळे दि. ४ जानेवारी २०२४ पासून श्री. पुंडलिक सोनवणे व श्री. प्रभाकर कोळी यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग सत्याग्रह पुकारणार असल्याचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी यांना २६ डिसेम्बर २०२३ रोजी सादर केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने