चोपडा तेली समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार

 चोपडा तेली समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार 

चोपडा दि.७(प्रतिनिधी): चोपडा तेली समाज तर्फे सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी पदविका  व विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचा, मातापित्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी खुशी जितेंद्र चौधरी, प्रांजल रितेश चौधरी, भाग्यश्री गणेश चौधरी, तनुष्का अरविंद चौधरी, ओम विजय चौधरी, ममता मनोज चौधरी, ऋतिका सुभाष चौधरी, निखिल गणेश चौधरी, कार्तिक सुरेश चौधरी, श्रीकांत प्रशांत चौधरी, नंदिनी भिका चौधरी, नेहा हिरालाल चौधरी, धनश्री प्रवीण चौधरी, अक्षय जितेंद्र चौधरी, गरिमा श्रावण चौधरी, प्रिया श्रावण चौधरी, मयूर रतिलाल चौधरी, जयेश मोतीलाल चौधरी, त्याचबरोबर विजय चौधरी, मनोज चौधरी, श्रावण चौधरी, प्रशांत चौधरी, प्राध्यापक सुभाष एकनाथ चौधरी ,पांडुरंग चौधरी, जितेंद्र चौधरी, आदी पालकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वारकरी रत्न हरिभक्त परायण श्री बापू महाराज लासुरकर हे होते .आचार्य प्रपन्न रामानुजदास श्रीधाम वृंदावन यांचे तसेच प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष के डी चौधरी, तालुका अध्यक्ष प्रशांत चौधरी, महिला अध्यक्ष सौ सीमा सुनील चौधरी, विश्वस्त श्री नारायण पंडित चौधरी, विश्वस्त श्री देवकांत के चौधरी, निवृत्त मुख्याध्यापक श्री सुनील हिरालाल प्राध्यापक श्री सुभाष एकनाथ चौधरी चौधरी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत  गुणी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना आचार्य प्रपन्न रामानुदास यांनी आशीर्वाद देऊन अभिनंदन केले. ह भ प बापू महाराज यांनी विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांचा गौरव केला. शिक्षणाने माणसाला प्रतिष्ठा पद प्राप्त होते. शिक्षणाने जीवन सुखी आणि समृद्ध करता येते. शिक्षण घेत असताना आपण संस्कारशील वागावे असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. त्यासाठी चोपडा तेली समाज राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. भावी आयुष्याच्या उन्नतीसाठी के. डी. चौधरी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या विश्वस्त मंडळाने व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने