मन्यावस्ती येथे भारतीय पत्रकार संघाचा माध्यमातून पत्रकार दिना निमित्त खासदार रक्षाताई खडसे यांच्याहस्ते आदिवासी बांधवाना ब्लॅकेट वाटप

 मन्यावस्ती येथे भारतीय पत्रकार संघाचा माध्यमातून पत्रकार दिना निमित्त खासदार रक्षाताई खडसे  यांच्याहस्ते आदिवासी बांधवाना ब्लॅकेट वाटप      

चोपडा दि.७(प्रतिनिधी) तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मन्या वस्ती या पाङ्यावर  भारतीय पत्रकार महासंघ च्या वतीने  आरोग्य शिबीरात 55 आदिवासी बांधवाची आरोग्य तपासणी करून व थंडीचे ब्लॅकेट वाटप करून "पत्रकार दिन" साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  रावेर लोकसभा मतदार संघाचे खासदार  रक्षाताई खडसे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उदघाट्न व थंडीचे ब्लॅकेट  वाटप करण्यात आले

   मागील वर्षा प्रमाणे यावर्षी देखील आदिवासी भागात भारतीय पत्रकार महासंघ च्या वतीने पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला . खासदार रक्षा खडसे यांनी सर्व आदिवासी बंधूना मिळणाऱ्या शासनाच्या योजना बाबत चौकशी करून मोफत रेशन, उज्ज्वला गॅस योजनेची माहिती देऊन संबंधित अधिकारी यांना आदेशानुसार त्वरित शासकीय योजनेचा लाभ परिसरातील सर्व आदिवासी बंधूना मिळावा अश्या सूचना केल्या.

यावेळी प्रकाश सरदार यांनी आदिवासी बंधूना  शिक्षणाचे महत्व पटवून दिले आदिवासी बांधवाचे त्यांचे हक्क घटनेत काय आहेत याबाबत मार्गदर्शन केले .   कार्यक्रमांस   मान्या झिंगा बारेला,भारतीय पत्रकार महासंघाचे अध्यक्ष नवलसिंग राजपूत, उपाध्यक्ष राकेश कोल्हे, सल्लागार प्रकाश सरदार, पत्रकार हेमंत पाटील,तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, माजी प.स.सभापती आत्माराम माळके अनु.जमाती जिल्हा अध्यक्ष मगन बाविस्कर, गजेंद्र जयसवाल, गोविंदराव सैदाणे, जिल्हा सरचिटणीस राकेश कृउबा समिती संचालक डॉ विकी सनेर जि प सभापती दिनेश पाटील पाटील,उत्तर महाराष्ट्र  अध्यक्ष विलास पाटील, चोपडा तालुका अध्यक्ष तुषार सूर्यवंशी, तालुका सचिव तौसिफ़ खाटीक, सह स्थानिक पत्रकार पी.आर. माळी, मनोज मोरे, जितेंद्रकुमार शिंपी, मनोहर देशमुख,भगवान न्हायदे, रावसाहेब पाटील, राजेंद्र चोधरी, प्रशांत सोनवणे, राजेंद्र बोदडे,आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, गट प्रमुख एलीजा मोरे, आशा वर्ककर राहाबाई बारेला, आरोग्य सेविका भिकूताई बोदडे,आदी पत्रकार बांधव उपस्थित होते . शेवटी आभार पी. आर. माळी सर यांनी मानले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने