प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सहाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांना दिमाखदार सुरुवात

 प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सहाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांना दिमाखदार सुरुवात

चोपडा,दि.७ (प्रतिनिधी) :  येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सहाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांचे दिमाखदार उद्घाटन दि ६ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाले. 

यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सौ. शैलाबेन मयूर यांच्या शुभहस्ते संस्थेचे ध्वजारोहण आणि एन सी सी च्या ९० कॅडेट यांनी पर्यवेक्षक एस एस पाटील, आर पी पाटील सर,श्रीमती जे आर बडगुजर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्या गजानन पाटील या विद्यार्थिनीच्या हस्ते ज्योत संचलन करून संपन्न झाले. संस्थेच्या परंपरेप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा देखील सत्कार संस्थेच्या वतीने  करण्यात आला. यात माजी उपमुख्याध्यापक एस जी डोंगरे, के के.विभागाच्या माजी शिक्षिका  एस एस कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्य लिपिक मिलिंद ए गुजराथी,सेवा निवृत्त सेवक सुरेश यशवंत चौधरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सौ एस एस कुलकर्णी यांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.

             कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक पी एस गुजराथी यांनी शाळेच्या यशस्वी निकालाचा आढावा घेतला. वर्षभरात विविध वकृत्व, निबंध, कला, क्रीडा, विज्ञान, शिष्यवृत्ती परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा त्यांनी गौरव केला.शाळेत सुरू असलेल्या स्टेम फोरम, प्रतापीय कला मंच, आयआयटी फाउंडेशन, विद्यार्थी दत्तक योजना आदी विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.




               यावेळी शासकीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत  महाराष्ट्र राज्यात  प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या केंद्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व  करणाऱ्या  गणेश दीपक महाजन तसेच चतुर्थ क्रमांक पटकावणाऱ्या प्रज्ञा विनायक महाजन या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गावातील विभागाच्या विद्यार्थ्यांनी एन एन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नयनरम्य लेझीम प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच वर्षभरात संपन्न झालेल्या सहशालेय उपक्रमांच्या फोटो प्रदर्शनाचे आणि १०६ व्या वर्धापन दिनानिमित्त  विभागस्तर भव्य फलक लेखन- रेखन महोत्सवाचे प्रदर्शन व उद्घाटन   करण्यात आले. सदर कार्यक्रमाचं आयोजन प्रशालेतील कलाशिक्षक पंकज नागपूरे व कमलेश गायकवाड यांनी केले. या महोत्सवात जिल्हा(नाशिक, जळगाव, धुळे), राज्य व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ३० कला शिक्षकांचा  सहभाग होता.

          चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल या नूतन वास्तूचे व पटांगणावरील खेळणी गृहाचे देखील उद्घाटन संस्थेचे चेअरमन राजाभाई मयूर यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी ४.०० वा इंग्लिश मिडियम स्कूल या विभागाचे *उडान* या शीर्षकावरील रंगारंग असे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. 

               यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सौ .शैलाबेन मयूर,उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन श्री राजाभाई मयूर, सचिव माधुरी मयूर, कार्यकारणी सदस्य भूपेंद्र गुजराथी,किरणभाई गुजराथी,शैलेश अग्रवाल, योगीभाई मयूर,दुर्गादास पाटील,सर्व आजी-माजी मुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक व संस्थेच्या विविध ज्ञान शाखांचे पदाधिकारी,शिक्षक बंधू भगिनी आणि लेखनिक कर्मचारी बंधू,समन्वयक गोविंद गुजराथी, डी टी महाजन, पालक बंधू आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             कार्यक्रमाचे ईशस्तवन पी बी कोळी, पंकज नागपुरे आणि त्यांच्या समूहाने सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एजाज शेख आणि पंकज शिंदे यांनी पार पाडले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक ए एन भट यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने