भगिनी मंडळ चोपडा द्वारा भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन

 भगिनी मंडळ चोपडा द्वारा भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन


चोपडा दि.२५( वार्ताहर) ःआयोध्या  येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त श्रीराम लल्ला विराजमान समिती चोपडा द्वारा सामुयिक रामरक्षा पठणचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा सौ पूनमताई गुजराथी यांनी या प्रसंगाचे औचित्य साधून भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित केली. यात ८ वी ते १० वी गट  अ. व ११ वी ते पुढे गट ब असे दोन गट ठेवून सर्वांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले .प्राचार्य सुनील बारी व प्रा संजय नेवे,श्री.भगवान बारी, ललित कला केंद्र चोपडा यांनी या स्पर्धेचे आयोजन व नियोजन आखले. 

या रांगोळी स्पर्धेचे परिक्षण कलाध्यापीका शितल देसाई व नुसरत जहाॅ रियाजोद्दीन यांनी केले.प्रताप विद्या मंदिर .महिला मंडळ माध्यमिक विद्यालय. विवेकानंद विद्यालय .बालमोहन विद्यालय .कस्तुरबा माध्यमिक विद्यालय .पंकज माध्यमिक विद्यालय व ललित कला केंद्र चोपडा इ.  शाळा / महाविद्यालयातील एकूण ५० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. एक रांगोळी दोन विद्यार्थ्यांनी मिळून गटागटाने काढलेली होती .रांगोळी साठी प्रभू श्री रामचंद्र यांच्या जीवनावरील प्रसंग असे विषय देण्यात आले होते या रांगोळी सोबत बोधवाक्य व संदेशही स्पर्धकांनी दिला.

याप्रसंगी सौ पुनमताई गुजराथी यांनी दीप प्रज्वलन करून रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन केले .भगिनी मंडळाच्या सहसचिव सौ अश्विनी बेन गुजराथी, सौ नीता अग्रवाल आदी उपस्थित होते.मोठ्या गटातून साक्षी पाटील व कल्याणी पाटील यांना प्रथम क्रमांक दिव्या सेतवाल व अर्चना वसावे द्वितीय क्रमांक तर मेघना पाटील व आरती माळी तृतीय क्रमांक बक्षिस देण्यात आले.ललित कला केंद्राना तीन बक्षीस देण्यात आले तर लहान गटात महिला मंडळ माध्यमिक विद्यालयातील श्रुती रामटेके व भैरवी महाले प्रथम क्रमाक,विवेकानंद महाविद्यालयातील महेश्वरी साठी द्वितीय क्रमांक तर नेहा महेश पाटील तृतीय क्रमांक असे बक्षीसे देण्यात आली.

तसेच प्राचार्य सुनिल बारी यांच्या संकल्पनेतून दिव्या सैतवाल,साक्षी पाटील,स्नेहल पाटील,अनूष्का पाटील,संचिता बारी यांनी ११x ७ फुटाची सुंदर व आकर्षक श्रीरामाची छवी रांगोळी व्दारे रेखाटले. सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने