बाळ शास्त्री जांभेकर यांनी स्वतंत्र स्तंभ निर्माण केला: अरुणभाई गुजराती

  बाळ शास्त्री  जांभेकर  यांनी स्वतंत्र स्तंभ निर्माण केला: अरुणभाई गुजराती

चोपडा दि.६(प्रतिनिधी) दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी लोकशाहीचे चार स्तंभ असतात परंतुु त्यांनी स्वतःच्या बळावर  एक वेगळा स्तंभ निर्माण केला पत्रकार शिवाय समाज व सरकार चालू शकत नाही पत्रकारांनी स्वरयुक्त लोकप्रतिनिधी म्हणून  काम केले पाहिजे जनतेला काय आहे पार्लमेंटला कळतं त्यात पत्रकाराची भूमिका फार मोठी असते असे प्रतिपादन  महाराष्ट्र राज्य विधानसभे चे माजी सभापती  अरुण भाई गुजराती यांनी येथे केले .

पत्रकार दिन आज तारीख सहा रोजी सकाळी दहा वाजता चोपडा शहरातील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अरुण भाई बोलत होते.  आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, पत्रकार समाजाची गरज असून प्रामाणिकता विश्वासहार्यता त्याला त्याचे पत्रकारितेत पाहिजे पत्रकारिता शोध व बोधाची असली पाहिजे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रास्ताविक  ज्येष्ठ पत्रकाररमेश पाटील यांनी केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार  अनिल पालीवाल,, संजय सोनवणे, श्याम जाधव सचिन जयस्वाल विनायक पाटील तसेच राजेंद्र गंगाधर पाटील यावेळी उपस्थित होते दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी बाळशास्त्रींना अभिवादन केले. आभार छोटू वारडे यांनी मानले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने