साने गुरूजी वसाहत व मल्हारपुरा उप आरोग्य केंद्रास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट

 

साने गुरूजी वसाहत व मल्हारपुरा उप आरोग्य  केंद्रास   जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट

चोपडा दि.६(प्रतिनिधी):आज दि.०६/०१/२०२४ रोजी शहरी आरोग्य वर्धीनी केंद्र अंतर्गत उप आरोग्य  केंद्र-साने गुरूजी वसाहत व मल्हारपुरा चोपडा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ. सचिन भायेकर,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ.जयंत मोरे, तथा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी  डॉ.विवेकानंद बिराजदार सोबतच, चोपडा तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदीप लासुरकर यांनी भेट दिली.
याप्रसंगी दवाखान्याची बाहेरील व आतील स्वच्छतेची पाहणी केली,OPd च्या रुग्णांशी हितगुज साधुन रूग्णांना घराजवळ  दवाखाना आल्यामुळे त्याचा सर्व नागरिकांनी फायदा घ्यावा व आरोग्य सुदृढ ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले,
परिसर स्वच्छ,पिण्यास स्वच्छ व शुद्ध पाण्याचे व्यवस्थापन ठेवणे, औषधींचा साठा पुरेसा ठेवणे, मुदत बाह्य औषधी ठेवू नये आदी सूचना वैद्यकीय अधिकारी डॉ.भरत पाटील तथा डॉ.जैस्वाल  यांच्यासह उपस्थीत सर्व कर्मचारी वर्गांना दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने