कोळी जमातीचे राज्यस्तरीय महाआंदोलन पाचव्या दिवशी सुरूच..आदिवासी कोळी समाज बहुउद्देशिय संस्थेचा जाहिर पाठिंबा

 *कोळी जमातीचे राज्यस्तरीय महाआंदोलन पाचव्या दिवशी सुरूच..आदिवासी कोळी समाज बहुउद्देशिय संस्थेचा जाहिर पाठिंबा


*जळगाव (प्रतिनिधी):-* महाराष्ट्र राज्यातील आदिवासी कोळी जमातींच्या अस्तित्वासाठी आणि संविधानिक हक्कांसाठी मंगळवार, दि. २३ जानेवारी २०२४ पासून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजचा पाचव्या दिवशी सुध्दा राज्यव्यापी महाआंदोलन सुरूच आहे. जोपर्यंत शासन प्रशासन आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. असे सुचक विधान राज्यव्यापी महाआंदोलनाचे निमंत्रक ऍडव्होकेट शरदचंद्र जाधव पुणे,  अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर जळगाव, आयोजक  सखाराम बिर्हाडे संभाजीनगर यांनी केलेले आहे. ह्या राज्यव्यापी महाआंदोलनास जळगाव आदिवासी कोळी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे उपोषणकर्ते पुंडलिक सोनवणे भोकर, पद्माकर कोळी डोंगरकठोरा यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.

      याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक भरत सपकाळे, उपाध्यक्ष भरत महाराज, सचिव रोहन सोनवणे, सदस्य अनिलराव कोळी, भिकनराव नन्नवरे, गोकुळ सुर्यवंशी, रविंद्र कोळी, संजय बाविस्कर, अक्षय सोनवणे, रामचंद्र तायडे, रविंद्र पाटील, गणेश बाविस्कर, रमाकांत सोनवणे, जितेंद्र सोनवणे, आनंदराव सपकाळे, शिवाजीराव सुर्यवंशी, नारायण सपकाळे, सागरकुमार सोनवणे, शैलेंद्रकुमार सपकाळे, जेष्ठ समाजसेवक प्रतापराव आमले,  सामा.कार्यकर्ते प्रा. भाऊसाहेब सोनवणे, मंगला सोनवणे, छाया कोळी, प्रा. हिरालाल सोनवणे, अशोक शिरसाठ, ह.भ.प.भागवत महाराज, रतन महाराज, नामदेव सपकाळे, एकनाथ कोळी, पांडुरंग सपकाळे, उत्तम चिंचाळे, डॉ.शंकरलाल सोनवणे, रामचंद्र सोनवणे, शांताराम सोनवणे, देविदास कोळी, दिपक बाविस्कर, विलास सोनवणे, युगांत जाधव यांचेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने