राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नितीन पाटील यांची नियुक्ती

 

राष्ट्रवादी  डॉक्टर सेलच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी  नितीन पाटील यांची नियुक्त


जळगाव दि.१२(प्रतिनिधी)जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस  डॉ.नितीन वसंतराव पाटील  यांची उत्तर महाराष्ट्र विभागीय डॉक्टर सेलचे अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.गेल्या सात आठ वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामांची पावती पाहून  पक्षाने जिल्हा  स्वितरावरुन विभागीय स्तरावर काम करण्याची संधी त्यांना दिली आहे  

कोरोना काळात केलेले कार्य असो,किंवा सांगली, कोल्हापूर च्या पूरस्थिती मध्ये जाऊन घेतलेले कॅम्प असतील,किंवा जळगाव जिल्ह्यात वेळोवेळी घेतलेले आरोग्य शिबीर असेल किंवा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व  कार्यकर्ते यांना 24 तास रुग्ण सेवेचे मार्गदर्शन व सहकार्य असेल ते  डॉ.नितीन पाटील यांनी केले आहे त्यांची  पक्षावर असलेली निष्ठा व जन सामान्यांची सेवा पाहुन  प्रदेश अध्यक्ष  आमदार श्री.जयंत पाटील  यांच्या आदेशान्वये डॉ.सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ.सुनील जगताप यांनी त्यांची  ही नियुक्ती  केली आहे ....
या निवडीबद्दल महसूलमंत्री  आमदार एकनाथराव खडसे,माजी पालकमंत्री अप्पासाहेब गुलाबरावजी देवकर,विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी पालकमंत्री अण्णासाहेब डॉ.सतिष पाटील,जिल्हाध्यक्ष अँड.रविंद्रभैय्या पाटील, माजी खासदार काकासाहेब वसंतराव मोरे, माजी आमदार राजीव दादा देशमुख, राज्याचे नेते डॉ.नरेंद्र काळे व डॉ.राहुल सूर्यवंशी, माजी जि.प.सदस्य संजय दादा गरुड यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अभिनंदन केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने