राष्ट्रवादीचे नेते खासदार शरदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी डॉक्टर सेल तर्फे वर्डी येथे रोगनिदान शिबिर

 राष्ट्रवादीचे नेते खासदार शरदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी डॉक्टर सेल तर्फे वर्डी येथे रोगनिदान शिबिर


चोपडा दि.११(प्रतिनिधी)देशाचे नेते खासदार श्री शरद राव पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल आयोजित भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन चोपडा तालुक्यातील वर्डी येथे जिल्हा परिषद मुला मुलींच्या शाळेत करण्यात आले आहे मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी माजी विधानसभा अध्यक्ष माननीय अरुण भाई गुजराती यांच्या शुभहस्ते या रोगनिदान शिबिराचे उद्घाटन होणार असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, माजी आमदार कैलास पाटील,माजी आमदार दिलीपराव सोनवणे, चोपडा तालुका राष्ट्रवादीचे नेते चंद्रहासभाई गुजराथी, डी.पी.साळुंखे सर माजी सभापती पंचायत समिती चोपडा,घनश्याम अण्णा पाटीलउपस्थित राहणार आहेत 

या शिबिरात डॉ.राहुल पाटील.डॉ. जगदीश सरवैया ,डॉ.हेमंत पाटील,डॉ.प्रफुल्ल पाटील,डॉ.निलेश चांडक सर, डॉ. प्रशांत साठे ,डॉ.जगमोहन छाबडा ,डॉ.नीरज चौधरी हे रुग्णांची तपासणी करणार असून या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुकाध्यक्ष डॉ. कांतीलाल पाटील तसेच डॉ. सेलचे विभागीय अध्यक्ष डॉ.सेल उत्तर महाराष्ट्र डॉ.नितीन पाटील तसेच श्री शशिकांत पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोपडा, लहुश  न्हायदे  तालुका युवक उपाध्यक्ष, विनायक रामदास चव्हाण उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ,डॉ .भरत धनगर युवक अध्यक्ष चोपडा तालुका, डॉ.सुखदेव गुजर , डॉ.दिनेश चौधरी व चोपडा तालुक्यातील डॉ सेलचे सर्व पदाधिकारी व राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी यांनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने