अजिंक्य लॉनजवळ भीषण अपघात.. चहार्डीचा रुपेशचा मृत्यू..

 अजिंक्य लॉनजवळ भीषण अपघात.. चहार्डीचा "रुपेश "चा मृत्यू..


चोपडा दि.१४(प्रतिनिधी) चोपडा शिरपूर  रस्त्यावर अजिंक्य लॉनजवळ भीषण अपघातात  १६ वर्षीय बालकांचा  मृत्यू  झाल्याची घटना घडली. पहाटे ७:०० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे चोपडयाहून  जीम मध्ये सराव करून घराकडे परतत असतांना काळाने रुपेश तुळशीराम रायसिंग यांच्यावर काळाने डाव साधल्याने  चहार्डी गावांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आहे. 

याबाबत  जनतेतून प्राप्त माहिती की,तालुक्यातील चहार्डी येथील   रुपेश तुळशीराम रायसिंग हा व मित्र  दुचाकीवर स्वार होऊन चहार्डी येथून  सकाळी साडेपाच वाजता निघून चोपडा येथील एका  जिम मध्ये व्यायामाच्या सरावासाठी आले होते. सराव आटोपून सकाळी सात वाजेच्या सुमारास गावाकडे परत जात असताना अजिंक्य लॉनजवळ  झालेल्या भीषण अपघातात रुपेश  रायसिंग  जबर जखमी झाला त्यास उप जिल्हा रुग्णालयात भरती केले असता  वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत झाल्याचे घोषित केले. याबाबत  शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता डॉ .प्रसाद पाटील( उप जिल्हा रुग्णालय चोपडा)यांच्या खबरीवरुन शहर पोलिसात अकस्मात मृत्यू  क्र .८९/२३ सीरपीसी १७४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास दिपक वसावे हे करीत आहेत.

 याबाबत दोषी कोण? हे सांगणे कठीण असून व्हायरल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एस टी बसचा  मागच्या बाजूचा धक्का बसल्याचे दिसत आहे  शिवाय घटनास्थळी एस.टी.बसचा पत्र्याचा तुकडा मिळाल्याची चर्चा आहे. पोलीस तपासात अधिक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने