छत्तीसगड जोहार आदिवासी कला मंचाचे तिवरसिंग पावरा ला बक्षीस

 छत्तीसगड जोहार आदिवासी कला मंचाचे तिवरसिंग पावरा ला बक्षीस





चोपडा दि.१४(प्रतिनिधी)भगिनी मंडळ चोपडा येथील ललित कला केंद्रातील तीवरसिंग पावरा याला *छत्तीसगड येथील जोहर आदिवासी कला मंच* स्थापन दिनानिमित्त *शहीद वीर नारायण सिंहजीन* च्या हुतात्मा दिनानिमित्त आदिवासी समाजातील कला गुणांना वाव देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात चोपडा येथील चित्रकला महाविद्यालयातील ए. टी. डी. द्वितीय वर्ष वर्गातील तिवरसिंग पावरा याला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. त्यात त्याला प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्राप्त झाले.

संस्थेचे  अध्यक्ष पूनमबेन गुजराथी व उपप्राचार्य आशिष  गुजराथी तसेच सहसचिव अश्विनीबेन गुजराथी प्राचार्य सुनील बारी प्रा. विनोद पाटील व प्रा. संजय नेवे यांच्यासह संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्यात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने