प्राचार्य सुनील हिरालाल चौधरी यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात

 

प्राचार्य  सुनील हिरालाल चौधरी  यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात


चोपडा दि.८(प्रतिनिधी) प्राचार्य श्री सुनील हिरालाल चौधरी  यांचा सेवापूर्ती समारंभ साक्री येथे प्रांत तहसीलदार व अन्य मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आदिवासी विभागात विविध पदांवर सेवा देत त्यांची काल मुख्याध्यापक पदावरून यशस्वी निवृत्ती झाल्याबद्दल मान्यवर अधिकाऱ्यांतर्फे त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी अभिनव गोयल  (भा प्र से) जिल्हाधिकारी धुळे यांच्या वतीने  प्रांताधिकारी श्री डॉ रवींद्र शेळके व सौ शेळकें , श्री साहेबराव सोनवणे तहसीलदार साक्री तसेच  प्रकल्प अधिकारी श्री प्रमोद पाटील  यांच्या वतीने  श्री मोरे  व तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार धुळे नंदुरबार येथील मुख्याद्यापक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त त्यांच्यावर माजी नगरसेवक जीवनभाऊ चौधरी, के डी चौधरी सर व तेली समाजातील मान्यवर मंडळी तसेच PVM विद्यालयातील सन1981 चे इ 10 वि चे सर्व मित्र मंडळी व दुनियादारी ग्रुप चे सर्व मान्यवर राज्य अध्यक्ष राजेश पाटील, प्रकल्प अध्यक्ष श्री ठाकरे सर तसेच चोपडा नगरीतील सर्व मान्यवर मंडळी आणि नातेवाईकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
सुनील हिरामण चौधरी यांनी देवझिरी येथे माध्यमिक शिक्षक म्हणून आपल्या सेवेस प्रारंभ केला होता
सहाय्यक प्रकल्प अधिकारी यावल गृहपाल, शिक्षण विस्तार अधिकारी,सहा.निवडणूक निर्णय अधिकारी आदी पदांवर सेवा बजावत  शेवटी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बोपसेल,ता.साक्री येथे प्राचार्य पदावर सेवा बजावली आहे.त्यांना आदर्श मुख्याध्यापक, आदर्श माध्यमिक शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त अनेकांनी त्यांचा कार्याचा गौरव करून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने