चोपडा नगर वाचन मंदिरात उद्या पासून शारदीय व्याख्यान मालास प्रारंभ
चोपडा दि.८(प्रतिनिधी)चोपडा नगर वाचन मंदिर, तालुका वाचनालयातर्फे दि.१०/१२/२०२३ ते दि.१५/१२/२०२३ कालावधीत गांधी चौक, चोपडा जि. जळगांव येथे शारदीय व्याख्यान माला २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१०/१२/२०२३, रविवाररोजी संदिप गादिया, सायबर क्राईम इन्व्हीस्चीकेशन एक्सपर्ट, पुणे यांचे
("सायबर क्राईम सायबर सुरक्षा") विषयावर व्याख्यान तसेच,दि.११/१२/२०२३, सोमवारी शिरीष चिटणीस,( प्रसिध्द लेखक, निमंत्रक पुणे शहर प्रतिनीधी (म.सा.प.) सातारा("वाचू आनंदे"वाचू)दि.१२/१२/२०२३, मंगळवारोजी
कविवर्य अरुण म्हात्रे, प्रसिध्द कवी, ठाणे("शब्द शब्द जपून ठेव"),दि.१३/१२/२०२३, बुधवाररोजी प्रा. डॉ. अरविंद देशमुख, गो.सी. टोम्ये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अमरावती("कृतार्थ करुया आपले जीवन"),दि. १४/१२/२०२३, गुरुवार प्रविण दवणे (ठाणे), प्रसिध्द कवी, लेखक, गीतकार("दिपस्तंभ मनातले जनातले"),दि.१५/१२/२०२३, शुक्रवाररोजी अक्षय जोग, प्रसिध्द लेखक, पुणे("कालजयी सावरकर")
तरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक डॉ. परेश मुरलीधर टिल्लु , गोविंद बाबुलाल गुजराथी
श्री.एस.टी. कुलकर्णी ,
श्री. आशिष अरुणलाल गुजराथी व सर्व संचालक मंडळाने केले आहे.
