ललित कला केंद्रातील माजी विद्यार्थ्यांचे जहांगीर आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शन

 ललित कला केंद्रातील माजी विद्यार्थ्यांचे जहांगीर आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शन



चोपडा,दि.८(प्रतिनिधी) भगिनी मंडळ, संचलित चोपडा, ललित कला केंद्रातील माजी विद्यार्थी चित्रकार जितेंद्र साळुंखे, वीरेंद्र सोनवणे, धनराज पाटील व लक्ष्मीकांत सोनवणे यांचे विविध शैलीतील सामाजिक आशयासह नैसर्गिक घटकांची चित्रे काढली असून मुंबई येथील *प्रख्यात व जगप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीत* या ठिकाणी चित्र प्रदर्शन दि.10 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथील प्रा. राजेंद्र पाटील (पारा) यांच्या शुभहस्ते चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

प्रमुख पाहुणे म्हणून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट चे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश देशपांडे, चोपडा येथील ललित कला केद्राचे माजी प्राचार्य राजेंद्र महाजन व मुंबई येथील जेष्ठ कलाशिक्षक हिरामण पाटील आणि आंतरराष्ट्रीय कवी बाळकृष्ण सोनवणे,चोपडा यांची उपस्थिती होती.


लक्ष्मीकांत सोनवणे यांनी कष्टकरी माणसांची जीवनावर मांडले ते आदिवासी भागातील असल्याने परिसरातील माणसांचे जीवनाचे चित्र कॅनव्हास वर काळ्याशाईने रेखाटलेले आहे.ते विरवाडे तालुका चोपडा येथील रहिवासी आहेत.धनराज पाटील यांनी नैसर्गिक पान फुलं झाडांचे अमृर्तशैली घेऊन चित्र रंगवलेली आहेत.तर वीरेंद्र सोनवणे यांनी माणसांमधील प्रवृत्ती रेखाटलेले आहेत.तर जितेंद्र साळुंखे यांनी सामाजिक आशय मांडलेला आहे.हरवलेला चेहराआक्रोश, यातना निरागसता असे विषय त्यांनी घेऊन चित्रे तयार केलीत. हे चौघेही विद्यार्थी ललित कला केंद्राचे असून चोपडा तालुक्यात राहणारे आहेत. इथ पर्यंतचा प्रवास व त्यातील मार्ग आमच्या सर्व गुरुजनांनी दाखविला असे सांगत ते त्यांना श्रेय देतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने