चोपड्यात खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नातून दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिर

  चोपड्यात खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नातून  दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिर 

 चोपडा,दि.23डिसेंबर2023(प्रतिनिधी): तालुक्यातील ज्या दिव्यांग व्यक्तींनी गेल्या फेब्रुवारीत महिन्यात नोंदणी केली असेल अशांना खासदार रक्षाताई खडसे यांच्या शुभहस्ते दि.२३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०:००वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कुत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे 

रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत *"चोपडा"* तालुक्यातील पूर्व तपसणी व नोंदणी झालेल्या दिव्यांग बांधवांसाठी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्या खास प्रयत्नाने *"कुत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत वाटप होत आहेत"* ...

तरी या शिबीरास येतांना जे दिव्यांग बांधव आहेत त्यांनी पुर्ण तपासणी पावती आधार कार्ड व दोन पासपोर्ट फोटो सोबत घेऊन यावेत .तरी दिव्यांग व्यक्तींनी मोठ्या उपस्थित राहून आपल्याशी निगडित साहित्याचा लाभ घ्यावा असे आवाहन        चोपडा विधानसभा निवडणूक प्रमुख गोविंद सैंदाणे,तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील शहर अध्यक्ष नरेंद्र पाटील तसेच भारतीय जनता पार्टी चे शक्तिकेंद्र प्रमुख बुथ प्रमुख सुपर वॉरियर्स जेष्ठ श्रेष्ठ सर्व सन्माननीय पदअधिकारींनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने