शासकीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून विवेकानंद विद्यालयाचा प्रथम क्रमांक

 शासकीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून विवेकानंद विद्यालयाचा प्रथम क्रमांक


चोपडा,दि.२२डिसेंबर २०२३ (प्रतिनिधी ) : प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील शासकीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन चुंचाळे येथील नूतन माध्यमिक शाळेत संपन्न झाले. या तालुकास्तरीय स्पर्धेत प्राथमिक गटातून विवेकानंद विद्यालयास प्रथम क्रमांक प्राप्त झाला 

यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे सर्वेश कल्पेश जोशी, हितेश अनंत पाटील, सत्यम गोपाल पाटील ,श्रीकांत प्रशांत चौधरी यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक व संस्थेचे विश्वस्त नरेंद्र भावे यांची प्रेरणा व  विद्यालयातील विज्ञान शिक्षक अजय पाटील सर व व अटल टिंकरिंग लॅब चे प्रशिक्षक योगेश पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त मंडळ , सर्व शिक्षकवृंद, सर्व पालकवृंद व विद्यार्थी वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने