चोपडा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती जाहीर

 चोपडा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती जाहीर 

चोपडा दि.२२डिसेंबर २०२३(प्रतिनिधी):पालकमंत्री ना.श्री. गुलाबराव पाटील यांचे  शिफारसी नुसार एकात्मिकृत विकासासाठी चोपडा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती कार्यकारिणी नुकतीच  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केली आहे.

या समितीत  पालकमंत्र्यांनी सुचविलेले तथा  विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत निवडून आलेले आमदार हे पदसिद्ध अध्यक्ष  असतात.आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे(अध्यक्ष),तर संबंधित पंचायत समितीचे  सभापती सह अध्यक्ष , तहसिल विभागातील खरेदी विक्री संस्थांचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य आणि तहसीलदार हे पदसिद्ध सचिव सचिव म्हणून काम पाहतात. या कार्यकारणीत जिल्हा नियोजन मंडळाच्या अध्यक्ष म्हणजे पालकमंत्री विविध प्रवर्गातील ५ अशासकिय सदस्य आणि ३ महिला सदस्यांची नियुक्ती करतात.  तालुका अशासकीय सदस्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली असून त्यात 

१. श्री, मच्छिंद्रनाथ वासुदेव पाटील रा. मोहिंदा ता. चोपडा,

२. श्री. शिवराज संभाजी पाटील रा. सनफुले ता. चोपडा,

३. श्री. कैलास राजाराम बाविस्कर रा. लासुरे ता. चोपडा,

४. श्री. नामदेव बाबूराव पाटील, रा. वडगाव बु. ता. चोपडा

५. श्री. गोपाल श्रीराम पाटील, रा. नारोदा ता. चोपडा,

 *अशासकीय महिला सदस्य* 

१. सौ. शीतल गोपाल देवराज, रा. गालंगी ता. चोपडा,

२. सौ. पुष्पाताई सुनील जैन, रा. चोपडा ता. चोपडा

३. सौ. उज्वला भास्कर पाटील, रा. गणपूर ता. चोपडा

उपरोक्त नवनिर्वाचित सदस्यांचे माजी आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे,कृऊबा सभापती नरेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते सागर ओतारी, विकास पाटील  आदींनी अभिनंदन केले आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने