चोपड्यात २ ते ९ जानेवारी भव्य कीर्तन सप्ताह

 चोपड्यात २ ते ९ जानेवारी भव्य कीर्तन सप्ताह



 चोपडा दि.३१(प्रतिनिधी)- संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य कीर्तन सप्ताहाचे आयोजन चोपडा येथे करण्यात आले आहे. दि. 2 जानेवारी ते दि. 9 जानेवारी 2024 पर्यंत रोज रात्री आठ ते दहा संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर तेली समाज मंगल कार्यालय श्रीराम नगर चोपडा येथे आठ दिवस भव्य कीर्तन सप्ताह संपन्न होत आहे.

कीर्तन सप्ताहाचे प्रथम पुष्प दिनांक 2 जानेवारी मंगळवार रोजी ह भ प गजानन महाराज चौगाव ,3जानेवारी बुधवार रोजी हभप सचिन महाराज वरखेडकर ,4 जानेवारी गुरुवार रोजी हभप मुकुंद महाराज  ढेकूकर, दि. 5 जानेवारी शुक्रवार रोजी ह भ प प्रसाद महाराज चोपडा, दि. 6 जानेवारी शनिवार रोजी ह भ प छत्रभुज  महाराज धरणगाव ,दि. 7 जानेवारी रविवार रोजी ह भ प तुळशीराम महाराज वेलेकर, दि. 8 जानेवारी सोमवार रोजी ह भ प गोपालदास महाराज मुक्ताईनगर ,9 जानेवारी मंगळवार रोजी हभप वारकरी रत्न बापू महाराज लासुरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होईल. या कार्यक्रमासाठी अविनाश महाराज लासुरकर, रितेश महाराज लासुरकर, सोहम महाराज लासुरकर, सोहन महाराज लासुरकर हे गायनाचार्य लाभले , रोहन महाराज लासुर , गौरव महाराज लासुरकर हे  मृदंगाचार्य लाभले आहे. छोटू महाराज लासुरकर, सुरेश महाराज लासुरकर, बापू महाराज लासुरकर, तेजस महाराज  चहार्डी, गोपीचंद महाराज चोपडा यांचे व पंचक्रोशीतील भजनी मंडळ यांचे अमोल सहकार्य लाभणार आहे. या भव्य कीर्तन सप्ताहाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन  संस्थेचे अध्यक्ष श्री के.डी . चौधरी, उपाध्यक्ष टी एम चौधरी व श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा विश्वस्त मंडळांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने