श्रीमद् भागवत महापुराण पारायण चोपडा येथे भव्य दिव्य कार्यक्रम

 श्रीमद् भागवत महापुराण पारायण चोपडा येथे भव्य दिव्य कार्यक्रम 



चोपडा दि.३१(प्रतिनिधी)- श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा तर्फे संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीचे निमित्ताने स्वर्गीय गं.भा. पार्वताबाई डुमन चौधरी, समाजाचे मा. विश्वस्त स्व. पितांबर भनकू चौधरी, स्व. भटू दौलत चौधरी, तसेच स्वर्गीय रोहिदास एकनाथ चौधरी यांचे स्मरणार्थ श्रीमद् भागवत महापुराण  मूळ पाठाचे पारायण दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत रोज स. 9:00 ते 12:00 व दु. 2:00 ते 5:00 या कालावधीत होत आहे. पारायणासाठी श्रीधाम वृंदावन येथील मूळ पाठ वाचक आचार्य अजित प्रपन्न रामानुजदास हे पारायण करणार आहेत. यांचे सोबत ज्या भाविकांना पारायणासाठी बसावयाचे असेल त्यांनी सोबत आपला ग्रंथ आणावा. पारायणासाठी जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने