चोपडा रोटरी क्लब तर्फे महिलांसाठी ४ रोजी मोफत गर्भाशय व स्तन कर्करोग तपासणी शिबिर

 

चोपडा रोटरी क्लब तर्फे महिलांसाठी ४ रोजी मोफत गर्भाशय व स्तन कर्करोग तपासणी शिबिर


चोपडा दि.३(प्रतिनिधी)रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे सोमवार दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यतच्या कालावधीत उपजिल्हा रुग्णालय, चोपडा. जि. जळगांव येथे  महिलांसाठी मोफत स्तनांच्या कॅन्सरसाठी मॅमोग्राफी व गर्भाशय मुखाच्या कॅन्सरसाठी पॅपस्मिअर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .
या सर्व तपासणींचा बाहेर खर्च रुपये ४०००/- पर्यन्त येतो, परंतू  शिबीरात वरील सर्व तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.फक्त १०० महिलांची तपासणी होईल त्यातही पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
तरी शिबिराचा लाभ ३५ते ६०वयोगटातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा असे आवाहन रोटरी अध्यक्ष चेतन टाटीया व सर्व रोटरी सदस्यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने