साखरे गावातील नुकसानग्रस्त ४ कुटूंबियांना वर्ल्ड व्हिजन इंडिया तर्फे आपत्कालीन मदतीचा हात

 साखरे गावातील नुकसानग्रस्त ४ कुटूंबियांना  वर्ल्ड व्हिजन इंडिया तर्फे आपत्कालीन मदतीचा हात 

धरणगांव दि.२१(प्रतिनिधी) :धरणगाव तालुक्यातील साखरे गावात  अचानक शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या  आगीत चार कुटुंबाचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने उघड्यावर आले आहेत. त्यांची गंभीर अवस्था पाहून वर्ल्ड व्हिजन इंडिया ही सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे सरसावली आहे.नुकसानग्रस्त कुटुंबियांना धान्य , कपडे, शैक्षणिक व किचन साहित्य देऊन माणूसकीचे दर्शन घडविल्याने  संस्थेचा कार्याचा गावभर गवगवा होत आहे.

 धरणगाव तालुक्याचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार  लक्ष्मण सातपुते  , ज्ञानेश्वर काकडे  यांचे समवेत वर्ल्ड व्हिजन इंडिया चे प्रकल्प अधिकारी जितेन्द्र गोरे  , वर्ल्ड व्हिजन इंडिया चे कर्मचारी रतिलाल वळवी यांनी या कुटुंबांची तातडीने भेट घेऊन  मदतीसाठी धावून आले. प्रति कुटुंबाला धान्य, कपडे, शाळेतील मुलाला साठी शैक्षणिक साहित्याची मदत तसेच किचन साहित्य , कंबल इतर संसारोपयोगी वस्तूंची मदत केली.

या वेळी साखरे गावाचे पोलिस पाटील घनशाम पाटील यांनी वर्ल्ड व्हिजन इंडिया  संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.  तहसीलदार  महिंद्र सूर्यवंशी  व ज्ञानेश्वर काकडे अप्पर तहसीलदार यांच्या हस्ते धरणगाव तहसील कार्यालय हा कार्यक्रम पार पडला.या वेळीस साखरे गावाचे सरपंच सुधाकर पाटील ,पोलिस पाटील घनशाम पाटील , रमेश पाटील, तहसिल कार्यालयाचे महसुल सहाय्यक गणेश पवार व  वर्ल्ड व्हिजन इंडिया चे कर्मचारी रतीलाल,  स्वयम् सेवक रचना जाधव, आरती पाटील व   ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने