चोपड्यात आमदारांच्या उपस्थितीत 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन‌ साजरा होणार.. निबंध स्पर्धेत शाळांनी सहभागी व्हावे: तहसीलदार भाऊसाहेब थोरात

 

चोपड्यात  आमदारांच्या उपस्थितीत 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन‌ साजरा होणार.. निबंध स्पर्धेत शाळांनी सहभागी व्हावे: तहसीलदार भाऊसाहेब  थोरात


चोपडा‌दि.२१ (प्रतिनिधी) चोपडा येथे  24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन‌ साजरा करण्यात येणार असून या निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून येथिल नगर परिषद समिती सभागृहात‌ ‌ चोपड्याचे‌ आमदार सौ‌.लताताई‌ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली चोपडा येथे राष्ट्रीय ग्राहक दिन  24 डीसेंबर‌ रोजी सकाळी 11‌ वाजता ‌ साजरा करण्यात येणार असून  या निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ‌ यासाठी ए‌.आर‌.डीजिटल‌ प्रेस‌ मिडिया काॅंसिल‌ चा‌ अंतर्गत कन्झूमर प्रोटेक्शन अॅंड‌  अवेअरनेस विंग‌ च्या ‌ सहभागातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या व ग्राहकांच्या प्रबोधनासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा व जिल्हा पुरवठा शाखा यांच्या संयुक्त सहभागातून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी माध्यमिक विभागातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत
सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले 

 स्पर्धे‌ साठी दोन गट असून विद्यार्थी गट ‌ व खूला गट  असून यात ‌ स्पर्धा होणार आहे या‌ निबंध स्पर्धेचे विषय -जागा‌ ग्राहक जागा, तक्रार करणार त्याला न्याय मिळणार ,अर्थ व्यवस्थेचा केंद्र ‌बिंदू ‌ हे हे ‌ विषय‌  विद्यार्थी गटात असून यासाठी खुला‌ गटात  प्रभावी ग्राहक संरक्षण 2019, चंगळवाद आणि ग्राहक , हे विषयअसून या निबंध स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ‌ चोपड्याचे‌ तहसीलदार भाऊसाहेब थोरात व पुरवठा तपासणी अधिकारी देवेंद्र नेतकर‌ यांच्या वतीने करण्यात आले आहे
.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने