अहो..$$ पाहिलतं का.. .! गरताड-कुरवेल रस्ता झालाय चकाचक .. आमदार सोनवणे दाम्पत्याच्या परिश्रमाची कम्माल अन् विकास कामांची आहे दे धम्माल..!

 अहो..$$ पाहिलतं का.. .! गरताड-कुरवेल रस्ता झालाय चकाचक .. आमदार सोनवणे दाम्पत्याच्या परिश्रमाची कम्माल अन् विकास कामांची आहे दे धम्माल..!


चोपडा दि.२१( महेश शिरसाठ):चोपडा तालुक्यात विकासाचा  सपाटा दे दणादण सुरू असून कडाक्याच्या थंडीतही विरोधकांना घाम फुटावा असा नजारा सुरू झाला आहे.गत् ५०वर्षात ज्या  डोळ्यांनी  चकाचक रस्ते पाहिले नाहीत त्या थकलेल्या नजरांना सुध्दा  आता विदाऊट चष्मा रस्ते दिसू  लागल्याचा करिष्मा बघावयास मिळत आहे.  एव्हढेच नाही हजारोंचे रस्ते आता कोटीत होऊ लागल्याने  तालुक्याचा कोपराही विकास बोलू लागला आहे. ही सर्व  जादु काही आपोआप झाली नसून तिचे  शिल्पकार कार्यसम्राट माजी आमदार प्रा.अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे व आमदार सौ.लताताई सोनवणे यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे फलित आहे. ही कामाची नुसती वाह वा.. नसून "वास्तव"आहे.ही वास्तविकता जनता जनार्दनाने स्वीकारली असून हर एक व्यक्तिने स्विकारावी अशी स्थिती आहे.नुकताच तीन कोटी रुपये खर्चून तयार झालेला गरताड - कुरवेल रस्ता चकाचक झाला आहे. ११ किलो मीटर अंतराचा हा रस्ता डांबरीकरण झाल्यामुळे परिसरातील रहदारीचा मोठ्ठा प्रोब्लेम स्वाॅल झाल्याने नागरिक जाम खुश झाले आहेत.विद्यार्थी, महिला व तरुण वर्ग  रस्त्यांचे भाग्य विधाते आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या नावाचा जयजयकार करीत आहेत.

खरं तर विकास कामे हे जोमाने होत असून नुसते राजकारण म्हणून न बघता  सत्य स्विकारण्याची सवय लावावी अन्  "सत्य मेव जय "ची आस धरावी असा सबुरीचा सल्ला  जागरूक जाणकारांकडून दिला जात आहे.त्यातचं गावातल्या महिला आता पुरूष मंडळींना सांगू लागल्या आहेत की,अहो..$$ पाहिलतं का.. .! गरताड-कुरवेल रस्ता झालाय चकाचक .. आमदार सोनवणे दाम्पत्याच्या परिश्रमाची कम्माल अन् विकास कामांची आहे दे धम्माल..!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने