चोपडा तालुक्यात रेशन दुकानदारांचा १ जानेवारीपासून बेमुदत बंद

 चोपडा तालुक्यात रेशन दुकानदारांचा १ जानेवारीपासून बेमुदत बंद

लासूर ता‌.चोपडादि.१९(वार्ताहर) चोपडा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दूकानदारांनाची बैठक आज संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चोपडा येथिल विश्राम गृह येथे संपन्न झाली‌ .

यावेळी स्वस्त धान्य दुकानदारांना येत असलेल्या अडचणी बाबतीत विचार विनिमय करण्यात आला तसेच आॅल‌ इंडिया फेअर प्राईज शाॅप डीलर्स फेडरेशन नविदिल्ली शी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन शाॅप परवानाधारक महासंघाने राज्य न देशव्यापी आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला असून राज्य संघटनेचे उपाध्यक्ष राजेश आंबूसकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि 1 जानेवारी 2024पासून आपल्या न्याय मागण्यांसाठी‌ आपली स्वस्त धान्य दुकान बेमुदत बंद ठेवण्यात येणार असून त्या बाबतीत चर्चा करण्यात आली ‌ तसेच दूकानदारांना‌ परमिट प्रमाणे पुर्ण माल मिळावा, तसेच जानेवारी महिन्याचा माल आतापासून उचल करु नये, तसेच धान्य इष्टांकाप्रमाणे उपलब्ध व्हावे अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली तसेच 16 जानेवारी 2024 रोजी संघटनेच्या दिल्ली येथे मोर्चा असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हि यावेळी अशोक बाविस्कर, विकास पाटील, मधूकर राजपूत यांनी आपल्या मनोगतात सांगितले ‌ यावेळी संघटनेचे पदाधिकारी ए‌ .डी.कोळी, दिलीप पालीवाल,ए‌.टी‌.जैन‌, दिपक चौधरी,कांतीलाल चौधरी, प्रविण पाटील, महेंद्र महाजन, संजय पाटील, आप्पा‌ जैन‌ ,गजानन ‌ पाटील,अशोक चौधरी, भगवान चौधरी,रुपेश कोष्टी,शाम‌ सोनार, तसेच आदिवासी भागातील,शहरी भागातील,व महिला बचत गटाच्या सौ‌.मिनाबाई‌ कोळी , श्रीमती सुमित्रा बाई शिरसाट यांच्या सह महिला‌ दूकानदारांची‌ उपस्थिती होती‌ यावेळी संघटनेच्या वतीने या बाबतीत चोपड्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने