किरकोळ भांडणातून पती कडून पत्नीचा निघृण खून..धनवाडी शेत शिवारात थरकाप उडविणारी घटना*

 किरकोळ भांडणातून पती कडून पत्नीचा निघृण खून..धनवाडी शेत शिवारात थरकाप उडविणारी घटना

 चोपडा दि.१९(प्रतिनिधी )* कौटूंबिक वादातून कुठल्यातरी धारदार हत्याराने सनकी पतीने पत्नी रेखाबाई दुरसिंग बारेला (44) हिची धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याची घटना चोपडा तालुक्यातील धनवाडी शिवारात घडली. या घटनेत  संशयित पती दुरसिंग बारेला (47 धनवाडी) यास पोलिसांनी शिताफीने पकडून   बेळ्या ठोकल्या आहेत.

 पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की,चोपडा शहरापासून जवळच असलेल्या मध्यप्रदेश मधील पांजरिया पोस्ट धवली ता.वरला जि. बडवाणी येथील रहिवासी व कामानिमित्त धनवाडी शिवारात वास्तव्यास असलेल्या  दूरसिंग टेटिया बारेला याचे व  पत्नी  रेखाबाई हिचे पैसे मागण्याच्या कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यात रागाच्या भरात  पतीने पत्नीवर  लाकडी दांडक्याने डोक्यावर तोंडावर व नको त्या ठिकाणी मारहाण करून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले.अन् तेथून पसार झाला. तर मुले आईच्या मृतदेहाजवळ बसून होती. मंगळवारी सकाळी हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर चोपडा पोलिसांना कळविण्यात आले त्यानंतर चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, दीपक विसावे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, गणेश सोनवणे यांनी 24 तासात खुनाची उकल करीत आरोपीला अटक केली आहे. 

याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला योगराज नामदेव पाटील रा. खाचणे ता. चोपडा यांच्या फिर्यादीवरून सी सी टी एन एस. गुरनं ६३३/२०२३ भादवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोउपनि घनश्याम तांबे हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने