राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे प्रवक्ता पीयुष पाटील यांचा मनोज जरांगे यांना जाहीर पाठिंबा
कोल्हापूर,दि.०४(प्रतिनिधी): मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावे तसेच धनगर समाजाला घटनेने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे या मागणीसाठी सर्वप्रथम नॅशनल सोशालिस्ट पार्टीच्या (वतीने तावडे हॉटेल चौकात वर्षभरापुर्वी निदर्शने रास्ता रोको करण्यात आला होता.
यावेळी तत्कालीन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप हराळे, जेष्ठ नेते यशवंतराव शेळके, माहिती अधिकार आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश मुळीक, विकास कदम मोराळकर, तेजस कारंडे तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी जेलभरो करून सरकार ला घाम फोडला होता. पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मनोज काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा एकदा भरारी घेत असुन महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पीयुष पाटील यांनी मराठा समाजाची परिस्थिती मांडताना मराठा समाज हा देखील आर्थिक दृष्टया दुर्बल झालेला असुन गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही. सध्या मराठयांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी आपल्यापैकी एक सर्वसामान्य मराठा बांधव मा. मनोज जरांगे-पाटील हे आमरण उपोषणास बसलेले आहेत. आता नाही तर कधीच नाही हीच ती वेळ आहे. राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्याची त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पीयुष पाटील यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल सोशालिस्ट पार्टीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. लवकरच सरकारने मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेवुन सरसकट मराठा समाजास टिकणारे आरक्षण दयावे अन्यथा नशनल सोशालिस्ट पार्टी राज्यामध्ये ठिकठिकणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून सरकारला सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही. असा इशारा पीयुष पाटील यांच्या वतीने देण्यात आला.
