.. मागण्या मान्य न झाल्यास आता कोळी समाज आक्रमक होईल : सुभाष सोनवणे
्जळगाव दि.३(प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून कोळी समाजाने जात प्रमाणपत्र त्वरित मिळावे यासाठी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन पुकारले आहे.मात्र प्रशासन कोणतीही दखल घेत नसून काना डोळा करीत आहे. आदिवासी जमातीचा अनादर दिवसेंदिवस वाढत चालला असून समाजाला त्वरित न्याय द्यावा अन्यथा समाज आक्रमकतेकडे आगेकूच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी जिल्हाधिकारींनी वेळीच लक्ष घालून समाजाला न्याय द्यावा अशी मागणी कोळी समाज कार्यकर्ते सुभाष सोनवणे व डॉ.शांताराम सोनवणे यांनी केली आहे. आज कोळी समाज शिष्टमंडळाने जिल्हाधिकारींची भेट घेतली या शिष्टमंडळात माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे,आमदार सुरेश भोळे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आदींनी भाग घेऊन जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली .
कोळी समाजाच्या प्रलंबित मागण्या शासन दरबारी तातडीने मांडून त्या मान्य करण्यास सांगावे. मागण्या मान्य न केल्यास समाज बांधव आक्रमक भूमिका घेईल असा इशारा सुभाष सोनवणे व डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिला. यादरम्यान सुभाष सोनवणे यांनी जिल्हाधिकारी
आणि डीएसपी यांना मागणी मान्य न झाल्यास कोळी समाज आक्रमक होईल, यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते असा इशाराही दिला.
