औरंगाबाद वन विभागात रेंजरपदी वरगव्हाणचे मोसीम तडवी
चोपडा,दि.७(प्रतिनिधी) तालुक्यातील वरगव्हाण येथील रहिवासी मोहसीन राजू तडवी यांची औरंगाबाद येथे वन विभागात वन चेकर म्हणून वर्णी लागली आहे.
मोसीम तडवी हे राजू अमीर तडवी यांचे चिरंजीव असून अतिशय कष्टातून मोठ्या जिद्दीने मेहनत घेऊन या पदावर पोहचले आहेत.त्यांच्या मेहनतीचे फळं हे आजी ,आई व वडिलांना देत असून दरगाह हजरत पीर गैबनशहा सरकार यांचा आशीर्वाद असल्याचे म्हटले आहे.
