कृषी विज्ञान केंद्रात युवकांसाठी कुक्कुटपालन -कौशल्य विकास प्रशिक्षण उत्साहात

 *कृषी विज्ञान केंद्रात युवकांसाठी कुक्कुटपालन -कौशल्य विकास प्रशिक्षण उत्साहात 

जळगाव दि.९(प्रतिनिधी)कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव येथे ग्रामीण युवकांसाठी *कुक्कुटपालन व्यवस्थापन* या विषयावर कौशल्य विकास निवासी प्रशिक्षण चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते .सदर प्रशिक्षण सहा दिवसासाठी आयोजित करण्यात आले होते.

 या प्रशिक्षणाचे कृषी विभाग (आत्मा) चे संयुक्त विद्यमाने आयोजिन करण्यात आले होते.या प्रशिक्षणाला जळगाव जिल्ह्यातून विविध तालुक्यातून 52 शेतकरी बांधव, पशुपालक बांधव, पोल्ट्री व्यावसायिक सुशिक्षित बेरोजगार, ग्रामीण युवक सहभागी झाले होते

ग्रामीण युवकांमध्ये उद्योजकता विकास निर्माण व्हावी त्याचप्रमाणे ग्रामीण युवक कुक्कुटपालन व्यवस्थापन च्या माध्यमातून स्वयंरोजगार तयार करावा या उद्देशाने सहा दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये डॉ. प्रशांत येवले, डॉ.निलेश बारी, डॉ.श्वेता पाटील,  या पशुधन विकास अधिकारी यांनी वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन केले, जसे कुक्कुटपालन मधिल विविध जाती, पक्ष्यांचे  आहार व्यवस्थापन, कुक्कुटपालनातील निवारा व्यवस्थापन, पक्ष्यांचे ब्रूडिंग व्यवस्थापन, कुक्कुटपालनातील लसिकरण रोग व आजार व्यवस्थापन , कुक्कुटपानाच्या विपणन व्यवस्थापन ,नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन योजना विषयी सविस्तर माहिती, पक्ष्यांमध्ये करावयाची घरगुती उपचार पद्धती, प्रथमोपचार पद्धती, कुक्कुटपालनातील महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण विविध शासकीय योजना या विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले व संवाद साधलाश्री. किरण मांडवडे ,विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांनी परसबागेतील कुक्कुटपालन व्यवस्थापन, मांसल कुक्कुटपालन व्यवस्थापन व पक्षांसाठी अझोला उत्पादन, लहान पक्ष्यांचे करावयाचे व्यवस्थापन,याविषयी सखोल मार्गदर्शन केलेश्री. सौदागर खामकर जिल्हा उद्योग केंद्र जळगाव, यांनी शासनाच्या विविध योजनांविषयी व अनुदानाविषयी माहिती दिली तसेच प्रकल्प अहवाल बाबत विस्तृत माहिती दिली श्री.  कुणाल चव्हाण, युवा उद्योजक , दिक्साई यांनी कुक्कुटपालनातील अर्थशास्त्र व व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले, 

श्री. देवेंद्र महाजन, तज्ञ प्रशिक्षक, आरसेटी, जळगाव  यांनी उद्योजकता विकास कार्यक्रम, प्रकल्प अहवाल, मोटिवेशन, व्यवसाय टाकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी  सविस्तर मार्गदर्शन केले

शेतकरी बांधवांना पक्ष्यांच्या विविध जाती, कुकुट पालनातील दैनंदिन व्यवस्थापन व प्रात्यक्षिकाचे अवलंब व्हावी, लसीकरणाचे प्रात्यक्षिकं, ब्रुडिंग चे प्रात्यक्षिकं करता यावे यासाठी सातपुडा हॅचरी, बॉयलर फार्म, लेअर फार्म येथे प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

या सहा दिवसीय प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्ह्याचे प्रकल्प संचालक (आत्मा)  तथा जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी श्री. रविशंकर चलवदे,  तेलबिया संशोधन केंद्राचे तीळ पैदासकार डॉ. संजीव पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती, श्री पांडुरंग साळवे, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) जळगाव, श्रीमती सरला गाडे व श्रीमती कल्पना बेलसरे, समतादुत बार्टी जळगाव , उपस्थित होते.तर कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी श्री. गणेश चाटे, उपायुक्त,महानगरपालिका, जळगाव. श्री.सूरज जगताप, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव,डॉ. हेमंत बाहेती, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र जळगाव, श्री. युनूस तडवी, जिल्हा प्रकल्प अधिकारी, बार्टी, जळगाव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या ग्रामीण युवकांसाठी निवासी कौशल्य विकास आधारित प्रशिक्षणाची तसेच समन्वयकाची मुख्य जबाबदारी श्री. किरण मांडवडे, विषय विशेषज्ञ, पशु विज्ञान व दुग्धशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांनी पार पाडली.सदर प्रशिक्षणाला कृषी विज्ञान केंद्र ,ममुराबाद फार्म ,येथील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने