आरोग्य केंद्र नेरी बु. येथे आरोग्य अधिकारी डॉ.भायेकर यांची भेट
नेरी बु.ता-जामनेर दि.८(प्रतिनिधी)आज दि. ८ ऑक्टोबर २३ रविवार रोजीप्राथमिक आरोग्य केंद्र-नेरी बु.ता-जामनेर येथेजिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ.सचिन भायेकर यांनी भेट दिली.
राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व बळकट करण्याच्या दृष्टीने शासकीय रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्राना भेटीत तपासणी करून तेथील औषधी व यंत्रसामग्री तसेच वैद्यकीय कर्मचारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याबाबत, आरोग्य यंत्रणा सुस्थितीत आहेत किंवा कसे, विशेषत्वाने नवजात अर्भक व बालके यांचे आरोग्य बाबत आरोग्य यंत्रणा सक्षम असणे आवश्यक असणे गरजेचे आहे,
दवाखान्याअंतर्गत स्वछता तथा परिसर स्वछता बाबत, स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्धता असणे बाबत.. तसेच,आयुष्मान भव कार्यक्रम, NATVM कार्यक्रमाचा सखोल आढावा घेऊन, योग्य रिपोर्टिंग करणे व अद्यावत राहणे विषयी सूचना केल्या, प्रसूती कक्ष अद्यावत ठेवणे, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर सुरू करण्याविषयी देखील आरोग्य अधिकारी यांनी आदेशित केले.
आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य केंद्राला दिलेल्या भेटीत मोलाचे मार्गदर्शन,करून सूचना दिल्याबद्दल, आरोग्य अधिकारी-डॉ.सचिन भायेकर यांचे आणि प्रभारी जिल्हा आयुष अधिकारी-डॉ.अमोल पाटील जि.प. जळगाव यांचे,प्रा.आ.केंद्र-नेरी बु. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेश पाटील यांनी आभार मानले.प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश पाटील, आरोग्य सहाय्यक-दिनकर माळी, राजेश कुमावत, आरोग्य सहाय्यीका-श्रीम जयश्री कुलकर्णी, opdआरोग्य सेविका-श्रीम.इंदिराआपोतीकर, १०२चा वाहन चालक-आप्पा शिंदे उपस्थित होते.
