बॅरिस्टर उमर कमाल फारूकी यांचा मिशन एज्यूकेशन व सत्कार

 *बॅरिस्टर उमर कमाल फारूकी यांचा मिशन एज्यूकेशन व  सत्कार 

भुसावळ,दि.३(प्रतिनिधी) येथील एम.आय तेली ईंग्लिश मीडियम स्कूल व भुसावल मुस्लिम समाज तर्फे एम.आय तेली स्कूल येथे मिशन एज्यूकेशन निमित्त लंडन येथून बॅरिस्टर ची डिग्री संपादन  करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करन्यासाठी आल्यावर बॅरिस्टर उमर कमाल फारूकी यांचे सत्कार करण्यात आले.

बॅरिस्टर उमर हे माजी मुख्यमंत्री ए.आर अंतुले नंतर महाराष्ट्रातील दूसरे व मराठवाठ्यातील पहिले बॅरिस्टर आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी हाजी मुन्ना ईब्राहीम तेली होते तर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हाजी कमाल फारूकी औरंगाबाद,हाजी करीम सालार साहेब,ए.एम देशमुख रिटार्ड CEO ZP, ईल्हाजुद्दीन फारूकी- प्रदेशाध्यक्ष उर्दू शिक्षक संघटना व डॉ.तारिक अजीज उपस्थित होते.सर्व प्रथम पवित्र कुरानची तिलावत करून कार्यक्रम सूरू झाले व या नंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. प्रस्ताविक मो.मुनव्वर खान यांनी केले. या वेळी बॅरिस्टर उमर कमाल फारूकी यांना "शान ए मराठवाडा" हे मोमेंटो (ट्रॉफी) मो मुनव्वर खान यांच्या तर्फे देण्यात आले.

बॅरिस्टर उमर फारूकी यांनी सत्कार स्वीकार भाषणांत मीशन एज्यूकेशन वर बोलतांना सांगितले की मुस्लिम समाज हा आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या खूप मागासलेला आहे.मात्र पालकांनी खचून न जाता लागलेच तर एक भाकरी कमी खावी मात्र आपल्या मुलांना शिक्षणांपासून वंचित न राहू द्यावे. सामाजातील हितचिंतकांनी एक सामाजिक फंड बनवून गरीब होतकरू मुलामुलींच्या शिक्षणासाठी मदत करावी.ईस्लामचे पवित्र ग्रंथ कुरान  मध्येही सर्वात पहिली आयत जी आली त्याच्यात "वाचा,शिक्षित व्हा" चे आदेश आले मात्र स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने मुस्लिम समाज शिक्षणात खूप मागे पडले.

या नंतर एम आय तेली स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बॅरिस्टर उमर फारूकी सोबत ईंग्रजी मध्ये वार्तालाप केले.

या वेळी साबीर मेंबर,नगरसेवक सलीम पिंजारी,सलीम सेठ चूडीवाले,अज्हर पटेल यांनी ही सत्कार केले.

तसेच जुनैद खान रहीम कुरैशी,युनूस मामा,शोयेब,जानी गवली,मुक्ताईनगरचे यासीन खान,यावलचे अमीन भाई,एडव्होकेट ईजलाल साहब,शकील हसरत,ईम्रान शेख,शाहरूख पटेल उपस्थित होते.

सूत्र संचालन हारून उस्मानी सरांनी केले.या कार्यक्रमात डॉक्टर,ईंजिनियर,वकील,शिक्षक वगैरे सर्वच शिक्षित व उच्चशिक्षित वर्गातील लोकं उपस्थित होते.आभार एम आय तेली इंग्लिश स्कूल चे प्रिंसीपल वाजीद सर यानी केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने