चोपडा येथे वर्षावास निमित्त सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न

 चोपडा येथे वर्षावास निमित्त सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न


    *चोपडा,दि.३(प्रतिनिधी) येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल,चोपडा शहर व तालुक्याच्या* वतीने वर्षावास प्रवचन कार्यक्रम दि.३/७/२०२३ पासुन सुरु असून *वर्षावास कार्यक्रम दि.०१/१०/२०२३ रविवार रोजी समाज मंदिर गौतम नगर स्टेट बॅक समोर चोपडा* येथे आयोजित करण्यांत आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान तालुकाध्यक्ष बापूराव गिरधर वाणे यांनी स्विकारले.

*वर्षवास प्रवचन विषय -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती लढाई* या विषयावर आयु.डॉ.आधार छगन पानपाटील सर यांनी धम्मदेसना प्रवचन दिले तसेच भारतीय बौद्ध महासभेचे *आयु.हितेंद्र बिरबल मोरे(मुख्याध्यापक कस्तुरबा माध्य.विद्यालय चोपडा)* ३४ वर्ष शैक्षणिक सेवा करून सेवानिवृत्त झाले.त्यांचा सेवापूर्ती सत्कार व गौरव सहपत्नीक करण्यांत आला.

*आयु.सुभाष भावलाल वारडे पदवीधर शिक्षक जि.प.शाळा कोळंबा यांना शैक्षणिक व सामाजिक कार्यामुळे अविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार* मिळाल्याने तसेचआयु.संतोष भिवसन अहिरे (जिभाऊ) यांची अंधश्रद्धा निर्मुलन समिती तालुकाध्यक्ष* पदी नियुक्ती झाल्याने त्यांचा गौरव व सत्कार करण्यांत आला. यावेळी मान्यवरांनी व सत्कारार्थीनी मनोगत व्यक्त केले. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ सदस्य व पदाधिकारी आयु.ओंकार दत्तू जाधव (आडगांव) आयु.गंगाराम अंबर कुवर (चोपडा) यांनी नुकतेच ७५वा वाढदिवस* साजरा केल्याने त्यांचा अमृत महोत्सव निमित्त सत्कार करण्यांत आला

  सदर कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन शहराध्यक्ष भरत शिरसाठ यांनी केले व शेवटी उपस्थितांचे आभार संजय साळुंखे यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने