चोपड्यात नगर वाचन मंदिरातर्फे म.गांधी व शास्त्रीजींना अभिवादन
चोपडा,दि. २(प्रतिनिधी)- येथील नगर वाचन मंदिरातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले.प्रारंभी गांधी चौकातील म.गांधी पुतळ्यास उद्योजक वसंतलाल गुजराथी व पदाधिका-यांच्या हस्ते माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.तसेच अमरचंद सभागृहात प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष आशिष गुजराथी,कार्यवाह गोविंद गुजराथी,डॅा.परेश टिल्लू,चोसाका व्हा.चेअरमन एस.बी.पाटील,संचालक किरण गुजराथी,श्रीकांत नेवे,संजीव गुजराथी,सुरेंद्र जैन, अवधूत ढबू,व्ही.एस.पाटील,अविनाश कुलकर्णी,स्नेहल पोतदार,प्रभाकर महाजन, रजनी सराफ,ग्रंथपाल गोपाळ दांडेकर,अॅड.डी.पी.पाटील,भागवत पाटील वाचक उपस्थित होते.